)
Indian Army Wishes Happy Diwali: दिवाळीच्या मुहूर्तावर भारतीय लष्कराने सोशल मीडियाच्या माध्यमातून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून दिवाळीच्या शुभेच्छा आहेत. पण या शुभेच्छा इतक्या खास आहेत की, कुणीच हा विचार केला नसेल. भारतीय लष्कराने दिवाळीच्या पहाटे एक व्हिडिओ पोस्ट केला आहे आणि या पोस्टमध्ये अनेक बॉम्ब, शेल आणि गनपावडरचे स्फोटकांचा आवाजत ऐकू येत आहेत जे भारतीय लष्करानेच सोडले आहेत. मात्र, हा व्हिडिओ जुना असून दिवाळीच्या मुहूर्तावरच रिलीज करण्यात आला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना भारतीय लष्कराने लिहिले की, दिवाळीच्या शुभेच्छा. हॅशटॅगमध्ये भारतीय लष्कराचा वापर करण्यात आला होता. या व्हिडीओच्या शेवटी भारतीय लष्कराने आणखी एक संदेश लिहिला आहे की, नेशन फर्स्ट म्हणजे देश आपल्यासाठी प्रथम येतो.
भारतीय लष्कराने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये काही ठिकाणी तोफांमधून गोळ्या झाडल्या जात आहेत तर काही ठिकाणी लष्कराचे जवान बंदुकीतून प्रत्युत्तर देत आहेत. एवढेच नाही तर दिवसा आणि रात्री होणाऱ्या हल्ल्यांना आपले लष्कर चोख प्रत्युत्तर देत आहे. हे पाहून हजारो भारतीयांनी कमेंटमध्ये आपली भावना आणि अभिमान व्यक्त केला आहे.
व्हिडिओला आतापर्यंत 34 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले असून लाखोंच्या संख्येने व्ह्यूज येत आहेत. इतकेच नाही तर दिवाळीच्या दिवशी मिळालेल्या शुभेच्छांवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रियाही दिल्या. एका यूजरने लिहिले की, "जय हिंद, जय हिंद की सेना. तुम्ही आमची दिवाळी आहात. देशाच्या प्रत्येक जवानाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा."
आणखी एका युजरने लिहिले की, "आमच्या वीर भारतीय जवानांना दिवाळीच्या शुभेच्छा ज्यांनी खात्री केली की,आम्ही आमच्या घरी दिवाळी शांततेने साजरी करू." तिसऱ्या युजरने लिहिले की, "आमच्या सैन्य बांधवांनो, भारतातील तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा." त्याचवेळी एकाने गंमतीत लिहिलं होतं, "ओ भाऊ, दिवाळीच्या मुहूर्तावर आज भिखारिस्तानमध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्रांची एक-दोन जोडी असती तर मजा आली असती." तसेच अनेकांनी भारतीय लष्कराचे अभिनंदन केले. दिवाळीच्या पहाटे सोशल मीडियावर भारतीय लष्कराने केलेल्या या पोस्टला भारतीयांनी लाइक केले.