भारतातील एकमेव रेल्वे स्थानक; पासपोर्ट आणि व्हिजा दाखवल्याशिवाय मिळत नाही प्रवेश; जबरदस्ती घुसणाऱ्यांना होते अटक

रेल्वेने प्रवेश करायचे असेल तर प्रवाशांना त्यांच्याकजे वैद्य रेल्वे तिकीट असणे काद्याने बंधनकारक आहे. तिकीट असले तरच प्रवाशांना रेल्वे स्थानकात प्रवेश मिळतो. मात्र, तुम्हाला कुणी रेल्वे स्थानकात प्रवेश देण्साठी व्हिसा किंवा पासपोर्ट दाखवा असे सांगितले तर? पण भारतात एक असे रेल्वे स्थानक आहे  जिथे पासपोर्ट आणि व्हिजा दाखवल्याशिवाय प्रवाशांना प्रवेश मिळत नाही. जाणून घेऊया हे रेल्वे स्थानक कोणते?

वनिता कांबळे | Updated: Mar 22, 2025, 07:53 PM IST
 भारतातील एकमेव रेल्वे स्थानक; पासपोर्ट आणि व्हिजा दाखवल्याशिवाय मिळत नाही प्रवेश; जबरदस्ती घुसणाऱ्यांना होते अटक

Indian Railway Station Passport And Visa Are Mandatory : रेल्वेने प्रवेश करायचे असेल तर प्रवाशांना त्यांच्याकजे वैद्य रेल्वे तिकीट असणे काद्याने बंधनकारक आहे. तिकीट असले तरच प्रवाशांना रेल्वे स्थानकात प्रवेश मिळतो. मात्र, तुम्हाला कुणी रेल्वे स्थानकात प्रवेश देण्साठी व्हिसा किंवा पासपोर्ट दाखवा असे सांगितले तर? पण भारतात एक असे रेल्वे स्थानक आहे  जिथे पासपोर्ट आणि व्हिजा दाखवल्याशिवाय प्रवाशांना प्रवेश मिळत नाही. जाणून घेऊया हे रेल्वे स्थानक कोणते?

भारतीये रेल्वेचे जाळ हे देशभर पसरलेले आहे. भारताच्या कानाकोपऱ्यात जाण्याची रेल्वेची सोय आहे. भौगोलिक तसेच विविध स्थानिक वैशिष्ट्यांमुळे भारतातील अनेक रेल्वे स्थानकांना वेगळी ओळख मिळाली आहे. याच कारणामुळे अनेक रेल्वे स्थानके वैशिष्ट्यपूर्ण बनली आहे. भारतात असचं एक रेल्वे स्थानक आहे जिथे  पासपोर्ट आणि व्हिजा दाखवल्याशिवाय प्रवेश मिळत नाही. विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांन सोबत पासपोर्ट तसेच व्हिजा ठेवावा लागतो. मात्र, भारतातील  अटारी श्याम सिंह रेल्वे  या रेल्वे स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सोबत पासपोर्ट आणि व्हिजा ठेवावा लागतो. पासपोर्ट आणि व्हिजा असेल तरच प्रवेशांना या स्थानकातून प्रवास करता येतो.

अटारी श्याम सिंह रेल्वे हे पंजाब राज्यातील अमृतसर जिल्ह्यात आहे. अटारी रेल्वे स्थानकात विना पासपोर्ट आणि व्हीसा शिवाय प्रवेश करता येत नाही. कुणी  पासपोर्ट आणि व्हिजा न दाखवता घुसण्याचा प्रयत्न केला तर 14 फॉरेन एक्ट म्हणजे व्हीसाच्या इंटरनॅशनल हद्दीत बेकायदा शिरकाव केल्याचा गुन्हा दाखल होऊन अटक देखील होऊ शकते. अटारी रेल्वे स्थानकातून पाकिस्तानसाठी ट्रेन मिळते. यामुळे या स्थानकात जाण्यासाठी प्रवाशांना व्हिसा तसेच पासपोर्ट दाखवावा लागतो. 

अटारी रेल्वे स्थानकातून एकमेव समझौता एक्सप्रेस धवात होती. या ट्रेनच्या तिकीटासाठी प्रवाशांना पासपोर्ट दाखवावा लागतो. या ट्रेनला विलंब झाल्यास  पाकिस्तान आणि भारत दोन्ही देश रजिस्टरमध्ये ट्रेन एण्ट्री लिहीतात. मात्र, 8 ऑगस्ट 2019 रोजी हे रेल्वे स्थानक बंद करण्यात आले.  आहे. समझौता एक्सप्रेसमध्ये बॉम्बस्फोट झाल्यानंतर ही ट्रेन बंद करण्यात आली आहे.