Indian Railway: तात्काळ तिकीट बुकिंग करण्याची वेळ बदलली; जाणून घ्या नवीन Timetable

Tatkal Ticket Booking: तात्काळ तिकिट बुकिंग करण्यासाठी अनेकजण आयआरसीटीसीवरुनच तिकिट बुक करतात. आता या वेळेत बदल करण्यात आला आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Dec 11, 2024, 11:41 AM IST
Indian Railway: तात्काळ तिकीट बुकिंग करण्याची वेळ बदलली; जाणून घ्या नवीन Timetable
Indian Railways has changed the timing of Tatkal ticket booking

Tatkal Ticket Booking: भारतीय रेल्वेने तात्काळ तिकिट बुकिंगच्या वेळेत बदल केले आहेत. रेल्वेच्या माहितीनुसार, प्रवाशांना आता बुकिंग प्रक्रिया अधिक सोप्पी होण्यास मदत मिळणार आहे. नव्या नियमांतर्गंत एसी क्लाससाठी तात्काळ तिकिट बुकिंग सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होणार आहे. तर, नॉन एसी क्लाससाठी ही प्रक्रिया 11 वाजल्यापासून सुरू होणार आहे. ही सुविधा त्या प्रवाशांसाठी खूप उपयोगी आहे ज्यांना अचानक प्रवास करावा लागू शकतो. किंवा आपतकालीन स्थितीत तिकिट बुक करावे लागू शकते. 

Add Zee News as a Preferred Source

असं बुक करा तात्काळ तिकिट

तात्काळ तिकिट बुक करण्यासाठी सगळ्यात पहिले प्रवाशांनी आयआरसीटीसी(IRCTC) च्या वेबसाइटवर जावून रजिस्टर करा. रजिस्टर केल्यानंतर Plan My Journey सेक्शनमध्ये जावून तुमच्या प्रवासाबाबत माहिती द्या. तुम्ही कधी प्रवास करणार, स्थानक कोणते ही सगळी माहिती भरा. नंतर बुकिंग टॅबमध्ये तात्काळचा पर्याय निवडा आणि तुम्हाला हवा असलेली ट्रेन आणि क्लास (एसी किंवा नॉन एसी) चा पर्याय निवडा. त्यानंतर प्रवाशांची माहिती, नाव, वय आणि ओळखपत्र याची माहिती द्या. आधार कार्ड, पॅन कार्ड आणि पासपोर्ट बुकिंग द्यावी लागते. 

बुकिंगची माहिती दिल्यानंतर तुम्ही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, युपीआय, नेट बँकिग किंवा डिजीटल वॉलेट या माध्यमांचा वापर करु शकता. पैसे भरल्यानंतर तिकिटाची माहिती एसएमएस किंवा ईमेलच्या माध्यमातून तुम्हाला पाठवण्यात येईल. कन्फर्म तात्काळ तिकिटावर तुम्हाला रिफंड मिळत नाही. जर ट्रेन रद्द झाली तरच रिफंड मिळते. 

तात्काळ तिकिटची प्रक्रिया अधिक सुलभ बनवण्यासाठी तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवू शकता. बुकिंगच्या आधी आयआरसीटीसीवर आधीच लॉगइन करा. हाय स्पीड इंटरनेटचा वापर करा आणि वेळ वाचवण्यासाठी प्रवाशांची माहिती आधीच देऊन ठेवा. पेमेंट प्रक्रियेसाठी युपीआय किंवा नेट बँकिगचा वापर करणे फायदेशीर ठरु शकते. 

भारतीय रेल्वेकडून करण्यात आलेले हे बदल प्रवाशांना आपातकालीन प्रवास करावा लागू शकतो हे लक्षात घेऊन करण्यात आले आहेत. प्रवाशांना चांगली सेवा पुरवण्याबरोबरच बुकिंग प्रक्रिया अधिक सहज होईल या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन नियम आणि या टिप्सचा वापर करुन तुम्ही तुमचा प्रवास अधिक सुलभ व सुकर करु शकता. 

About the Author

Mansi kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्रा टाइम डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि अर्थ (infrastructure) या विषयात विशेष रुची आहे. त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड. इन्फ्रास्ट्रक्चर आणि गुन्हे या बातम्यांमध्ये हातखंडा.

...Read More