Indian Railways : रेल्वेप्रवासासाठी घाईगडबडीत चुकीच्या तारखेचं तिकीट काढलं? ते कॅन्सल करण्याऐवजी करा 'हे' सोपं काम

Indian Railways : रेल्वेनं प्रवास करण्यामागचं मुख्य कारण ठरतं ती म्हणजे वेळेची बचत. रस्तेवाहतुकीच्या तुलनेत रेल्वेनं किमान खर्चात अपेक्षित प्रवास कमी त्रासासह पार पडतो.   

सायली पाटील | Updated: Nov 29, 2024, 11:01 AM IST
Indian Railways : रेल्वेप्रवासासाठी घाईगडबडीत चुकीच्या तारखेचं तिकीट काढलं? ते कॅन्सल करण्याऐवजी करा 'हे' सोपं काम
Indian Railways How to change date in confirmed ticket

Indian Railways : सवयीचा भाग नसेल, तर एखादं काम करताना उडणारा गोंधळ अतिशय स्वाभाविक आहे. रेल्वेचं तिकीट काढताना पहिल्यांदाच हे काम करणाऱ्यांच्या ही बाब पहिल्या काही मिनिटांतच लक्षात येते आणि यात गैर काहीच नाही. नकळतच माहिती आणि तारखांचे इतकी रकाने भरताना एखादा आकडा चुकतो आणि जमू आभाळ कोसळलं अशीच भावना अनेकांच्या मनात घर करते. आता मात्र रेल्वेचं तिकीट काढताना एखादी चूक झालीच, तर तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. 

Add Zee News as a Preferred Source

Indian Railways प्रवाशांच्या मदतीसाठी हजर 

प्रवाशांच्याच हितासाठी आणि प्रवाशांना केंद्रस्थानी ठेवत विविध सुविधा पुरवणाऱ्या भारतीय रेल्वेकडून काही अशाही सुविधा पुरवण्यात येतात ज्याची प्रवाशांना मोठी मदत होते. त्यामुळं रेल्वेचं तिकीट एखाद्या चुकीच्या तारखेसाठी आरक्षित केलं तर त्यात बदल करता येणार आहेत. हे तिकीट प्रवासी त्यांच्या कोणत्याही नातेवाईकाच्या नावावर फिरवू शकतात, पण इथंही काही नियमांचं पालन केलं जाणं अपेक्षित आहे. रेल्वेच्या अटीशर्थींनुसार प्रवासी समुहानं प्रवास करत असल्यास तिकीट दुसऱ्या प्रवाशाच्या नावे करण्याची मुभा इथं दिली जाते. 

कोणकोणत्या तिकीटांमध्ये करता येतो बदल? 

ऑफलाइन बुकिंग: जर लांब पल्ल्याच्या प्रवासाचं तिकीट रेल्वेच्याच तिकीट आरक्षण खिडकीवरून आरक्षित केलं असेल तर त्यामध्ये तुम्ही तारीख किंवा नाव बदलू शकता. 

ऑनलाइन बुकिंग: जर एखाद्या प्रवाशानं IRCTC चं संकेतस्थळ किंवा अॅपच्या माध्यमातून तिकीच बुक केलं असेल तर मात्र इथं बदल करता येणं शक्य नाही. 

हेसुद्धा वाचा : November Salary: नोव्हेंबर महिन्याचा पगार आज येणार की उद्या? गोंधळात असाल तर आताच पाहा ही माहिती 

तिकीटावरील नाव किंवा तारीख बदलण्यासाठी काय करावं? 

तिकीटावर वरील नाव बदलण्यासाठी प्रवासाच्या 24 तासांपूर्वी स्थानकावर जावं, तर तारीख बदलण्यासाठी 48 तासांपूर्वी रेल्वेस्थानकावर जाऊन मूळ तिकीटाची प्रत आणि एक अर्ज सोबत न्यावा. इथं तिकीटामध्ये बदल करण्यासाठी रेल्वे विभागाकडून किमान शुल्क आकारलं जातं. 

महत्त्वाची बाब म्हणजे तुम्ही ज्या तारीख आणि नावानं तिकीटामध्ये बदल करत आहात त्या तारखेला अमुक एका रेल्वेमध्ये आसनक्षमता असणंही तितकंच महत्त्वाचं. 

About the Author

Sayali Patil

सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'मधील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी 'एबीपी माझा' च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत. 

...Read More