coronavirus: भारताची स्थिती काय आहे? WHOकडून आकडे जाहीर
भारतात कोरोना व्हायरस रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
नवी दिल्ली : भारतात कोरोना व्हायरस रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. परंतु दिलासादायक बाब म्हणजे इतर देशांच्या तुलनेत भारताची स्थिती चांगली असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेकडून सांगण्यात आलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, भारतात कोरोनाच्या कन्फर्म झालेल्या प्रकरणांची टक्केवारी 7.1 प्रति लाख आहे. तर जगातील कोरोना व्हायरच्या आकडेवारीचं प्रमाण प्रति 60 लाख आहे.
जागतिक आरोग्य संघटनेकडून देण्यात आलेल्या 17 मेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, अमेरिकेमध्ये कोरोनाची एकूण 14,09,452 प्रकरणं आहेत. तर कन्फर्म प्रकरणांचा दर 431 प्रति लाख इतका होता. रशियामध्ये कोरोनाच्या 2,81,752 केसेसची नोंद करण्यात आली, तर कन्फर्म केसेसचा दर 195 प्रति लाख होता.
रशियानंतर कन्फर्म केसेचा सर्वाधिक दर यूकेमध्ये असून यूके यात तिसऱ्या क्रमांकावर आहे. यूकेमध्ये 17 मेपर्यंत कोरोनाच्या 2,40,165 प्रकरणांची नोंद झाली, तर कन्फर्म झालेल्या प्रकरणांची टक्केवारी 361 प्रति लाख आहे. यूकेनंतर या यादीमध्ये स्पेन, इटली, ब्राझील, जर्मनी, तुर्की, फ्रान्स आणि ईराण यांसारख्या देशांचा समावेश आहे.
भारतात 17 मेपर्यंत कन्फर्म केसेची संख्या जवळपास 96,169 इतकी नोंद झाली. तर कन्फर्म केसेचा दर 7.1 प्रति लाख इतका होता.
भारतात कोरोना रुग्णांच्या दुपटीचा वेग मंदावला; रिकव्हरी रेटही सुधारला
दरम्यान भारतात आतापर्यंत 1 लाख 1 हजार 139 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 58 हजार 802 जणांवर उपचार सुरु आहेत. तर 39 हजार 174 लोक कोरोनातून बरे झाले आहेत. भारतात आतापर्यंत 3 हजार 163 जणांचा मृत्यू झाला आहे.
केरळच्या आरोग्यमंत्री केके शैलजा ठरल्या 'कोविड-१९ रणरागिणी'