IndiGo Flight Declared Mayda : 12 जून 2025 रोजी झालेल्या अहमदाबाद लंडन विमान दुर्घटनेनंतर जगभरात खळबळ उडाली. अहमदाबादहून लंडनला जाणारं एअर इंडियाचं बोईंग विमानाने टेक ऑफ केले. उड्डाणानंतर अवघ्या 30 सेकंदात कोसळलं.या विमानातून 242 जण प्रवासी करत होते. त्यातील 241 जणांचा मृत्यू झाला. अहमदाबाद विमान अपघातानंतर आणखी एक अपघात टळला. इंडिगोच्या गुवाहाटी-चेन्नई विमानाचे बंगळुरूमध्ये आपत्कालीन लँडिंग करण्यात आले (IndiGo's Guwahati-Chennai flight emergency landing at Bengaluru airport) . पायलटने Mayday कॉल दिला होता.
प्राथमिक माहितीनुसार, विमानात इंधन कमी होते. त्यानंतर या विमानाचे केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Kempegowda International Airport ) इमर्जन्सी लँडिग करण्यात आले. इंडिगो विमानाच्या आपत्कालीन लँडिंगची ही घटना गुरुवारी घडली. या घटनेनंतर वैमानिकाला पदावरुन हटण्यात आले आहे. इंडिगो विमानात इंधनाची गंभीर कमतरता होती, त्यानंतर ते बेंगळुरूमध्ये सुरक्षितपणे उतरवण्यात आले.
दुर्घटनेचा अर्थात Mayday कॉल आल्यानंतर, एटीसी (हवाई वाहतूक नियंत्रण) ने ग्राउंड स्टाफला कळवले. यानंतर ताबडतोब बचाव पथक तयार करण्यात आले. वैद्यकीय आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते. विमान रात्री 8.20 वाजता हे विमान सुरक्षितपणे लँड करण्यात आले. शुक्रवारी, मदुराईला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात हवेत तांत्रिक बिघाड झाला आणि त्यांनी चेन्नईत परतण्याची आणि उतरण्याची परवानगी मागितली. सूत्रांनी सांगितले की, विमानात सुमारे 68 प्रवासी होते आणि योग्य सुरक्षा उपायांसह सर्व प्रवाशांना खाली उतरवण्यात आले.
अहमदाबाद विमान अपघातापूर्वीही 'मेडे कॉल' करण्यात आला होता. एअर इंडियाचे बोईंग 787-8 ड्रीमलायनर विमान १२ जून रोजी अहमदाबादहून लंडनला जात होते. अहमदाबादहून उड्डाण घेतल्यानंतर आणि अपघातापूर्वी लगेचच 'मेडे कॉल' आला. उड्डाणानंतर अवघ्या 30 सेकंदात कोसळलं.या विमानातून 242 जण प्रवासी करत होते. त्यातील 241 जणांचा मृत्यू झाला.
IND
387(112.3 ov)
|
VS |
ENG
145/3(43 ov)
|
Full Scorecard → |
MAW
(20 ov) 166/8
|
VS |
GER
158(19.5 ov)
|
Malawi beat Germany by 8 runs | ||
Full Scorecard → |
TAN
(20 ov) 154/7
|
VS |
BRN
157/4(16.2 ov)
|
Bahrain beat Tanzania by 6 wickets | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.