IPS Officer Arrested in Corruption Case: केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याला भ्रष्टाचार प्रकरणात अटक केली आहे. आयपीएस अधिकारी पंजाबमधील रोपार रेंजमध्ये उपमहानिरीक्षक (डीआयजी) म्हणून नियुक्त होता. अधिकाऱ्याने 8 लाखांची मागणी केल्याने या प्रकरणाचा तपास केला असता त्याच्याकडे घबाड असल्याचं उघड झालं. तपास केला असता त्याच्याकडे 5 कोटी रुपये रोख, आलिशान वाहनं, दागिने आणि महागडी घड्याळं यासह मोठ्या प्रमाणात संपत्ती असल्याचं समोर आलं आहे.
2009 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी डीआयजी हरचरण सिंग भुल्लर यांना कृष्णा नावाच्या एका व्यक्तीसह अटक करण्यात आली आहे, ज्याने कथितपणे त्यांचा मध्यस्थ म्हणून काम केले होते. सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक व्यावसायिकाविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या फौजदारी खटला बंद करण्यासाठी मध्यस्थामार्फत लाच मागताना आणि स्वीकारताना हा अधिकारी पकडला गेला. अधिकारी दर महिन्याला त्याच्याकडे पैशांची मागणी करत होता.
पंजाबमधील फतेहगड साहिब येथील आकाश बट्टा नावाच्या भंगार विक्रेत्याने पाच दिवसांपूर्वी दिलेल्या लेखी तक्रारीनंतर गुरुवारी सीबीआयने गुन्हा दाखल केला. तक्रारदाराने आरोप केला आहे की डीआयजी भुल्लर यांनी सुरुवातीला लाच म्हणून 8 लाखांची मागणी केली होती. तसंच दर महिन्याला तडजोड करण्यासाठी पैसे न दिल्यास त्याच्या व्यवसायाशी संबंधित बनावट प्रकरणात अडकवण्याची धमकी देत होता असं तक्रारीत सांगण्यात आलं होतं.
सीबीआयच्या एफआयआरनुसार, भुल्लरने त्यांचा सहकारी कृष्णामार्फत पैसे देण्याची मागणी करत होता. कृष्णा पैशांसाठी वारंवार दबाव टाकत होता. एका संभाषणात, कृष्णा सांगत आ हेकी, "ऑगस्टचे पेमेंट दिले गेले नाही, सप्टेंबरचे पेमेंट दिले गेले नाही."
प्राथमिक पडताळणीनंतर, सीबीआयने चंदीगडच्या सेक्टर 21 मध्ये सापळा रचला. कारवाईदरम्यान, डीआयजीच्या वतीने तक्रारदाराकडून 8 लाख रुपये स्वीकारताना कृष्णा रंगेहाथ पकडला गेला. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, पैसे मिळाल्यानंतर लगेचच, तक्रारदार आणि डीआयजी यांच्यात एक कॉल आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये अधिकाऱ्याने पैसे मिळाल्याची कबुली दिली आणि दोघांनाही त्यांच्या कार्यालयात जाण्याची सूचना दिली.
या पुराव्याच्या आधारे, सीबीआय पथकाने डीआयजी भुल्लर यांना मोहाली येथील त्यांच्या कार्यालयातून कृष्णासह अटक केली.
अटकेची कारवाई केल्यानंतर, सीबीआयने रोपार, मोहाली आणि चंदीगडमधील भुल्लरशी संबंधित अनेक ठिकाणांवर छापे टाकले. यावेळी सापडलेला मुद्देमाल पाहून अधिकारीदेखील चक्रावले.
- अंदाजे 5 कोटी रुपये रोख (मोजणी अजूनही सुरू आहे)
- 1.5 किलो सोने आणि दागिने
- पंजाबमधील स्थावर मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे
- दोन आलिशान वाहनांच्या चाव्या - एक मर्सिडीज आणि एक ऑडी
- 22 महागडी घड्याळं
- लॉकरच्या चाव्या आणि 40 लिटर आयातित दारू
- बंदुक आणि दारूगोळा, ज्यामध्ये डबल-बॅरल शॉटगन, पिस्तूल, रिव्हॉल्व्हर आणि एअरगनचा समावेश आहे.
कथित मध्यस्थ कृष्णाच्या घरातून सीबीआयने अतिरिक्त 21 लाख रुपये रोख जप्त केले आहेत. भुल्लर आणि कृष्णा दोघांनाही शुक्रवारी न्यायालयात हजर केलं जाणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. मालमत्तेची संपूर्ण व्याप्ती आणि मनी लाँड्रिंगचे संभाव्य संबंध निश्चित करण्यासाठी पुढील शोध आणि तपास सुरू आहेत.
2009 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले भुल्लर यांनी पटियाला रेंजचे डीआयजी, दक्षता ब्युरोचे सहसंचालक आणि मोहाली, संगरूर, खन्ना, होशियारपूर, फतेहगढ साहिब आणि गुरुदासपूर येथे वरिष्ठ पोलिस अधीक्षक अशा अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.
2021 मध्ये, भुल्लर यांनी शिरोमणी अकाली दलाचे नेते बिक्रम सिंग मजिठिया यांच्याविरुद्धच्या हाय-प्रोफाइल ड्रग्ज तस्करी प्रकरणाची चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकाचे (एसआयटी) नेतृत्व केले. त्यांनी पंजाब सरकारच्या ड्रग्ज विरोधी मोहिमेतही प्रमुख भूमिका बजावली.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, भुल्लर यांनी नोव्हेंबर 2024 मध्ये रोपर रेंजचे डीआयजी म्हणून पदभार स्वीकारला आणि मोहाली, रूपनगर आणि फतेहगढ साहिब जिल्ह्यांचे निरीक्षण केले. ते पंजाबचे माजी पोलिस महासंचालक (डीजीपी) एमएस भुल्लर यांचे पुत्र आहेत.
शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे.
...Read More|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
AUS
(20 ov) 186/6
|
VS |
IND
188/5(18.3 ov)
|
| India beat Australia by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(49.5 ov) 271
|
VS |
USA
273/6(49 ov)
|
| USA beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.