Iran Israel War: युद्धात थेट सहभाग नाही, तरीही भारताचं मोठं नुकसान; 4 दिवसांत मोठ्या रकमेची राखरांगोळी

Iran Israel War : इस्रायल आणि अमेरिकेनं इराणवर हल्ले केले आणि इराणनंही या हल्ल्यांचं तोडीस तोड उत्तर देण्यास सुरुवात केली. पाहता पाहता मध्यपूर्वेकडील देशांमध्ये प्रचंड तणावाची स्थिती निर्माण झाली आणि...   

सायली पाटील | Updated: Mar 3, 2026, 07:17 PM IST
Iran Israel War: युद्धात थेट सहभाग नाही, तरीही भारताचं मोठं नुकसान; 4 दिवसांत मोठ्या रकमेची राखरांगोळी
Iran Israel War impact on india daily losses of crores for oil price and low currency details inside

Iran Israel War : आखाती देशांवर असणारं युद्धाचं सावट दर दिवशी आणखी गडद होत असतानाच आता फक्त मध्यपूर्वेतील राष्ट्रांपुरताच हे संकट सीमित राहिलं नसून पाश्चिमात्य देशांसह भारतावरही त्याचे थेट परिणाम होतना दिसत आहेत. हे परिणाम आर्थिक स्वरुपातील असून,  भारतावर त्याचा दुहेरी परिणाम होताना दिसत आहे. 

Add Zee News as a Preferred Source

इस्रायल- इराण संघर्षाचा भारतावर दुहेरी प्रभाव 

कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये झालेली वाढ आणि डॉलरच्या तुलनेत दर दिवशी कोलमडणारा रुपया असं हे दुहेरी संकट असून आर्थिक नाण्याच्याच या दोन बाजू ठरत आहेत. तज्ज्ञांच्या प्राथमिक अंदाजांनुसार फक्त चार दिवसांमध्येच भारतानं कोट्यवधींची रक्कम गमावली असून देशाच्या तिजोरीवर 2000 कोटींचा अतिरिक्त भार वाढला आहे. 

हेसुद्धा वाचा : प्रायव्हेट जेटनं प्रवास; दुखापतग्रस्त ख्रिस्तीयानो रोनाल्डोनं युद्धाच्या भीतीपोटी रातोरात सौदी अरेबिया सोडला? 

तेलाच्या दरांमुळं किती नुकसान? 

भारत दर दिवशी जवळपास 5 मिलियन म्हणजेच 50 लाख बॅरल कच्च्या तेलाची आयात तरतो. जर सरासरी 10 डॉलर प्रति बॅरल इतकी दरवाढ झाली तरीही दर दिवशी हा एकूण आकडा 50 लाख बॅरलनुसार रुपयाची किंमत 91 रुपये प्रतिडॉलर इतकी असल्यास दर दिवशी भारताला 455 कोटी रुपये इतका वाढीव खर्च करावा लागत आहे. म्हणजेच युद्धापासूनच्या चार दिवसांचे साधारण 1820 कोटी रुपये इतका वाढीव भार. 

रुपया कसा घाम फोडतोय? 

रुपयाची किंमत दर दिवशी कोलमतच असल्यामुळं भारतीय तिजोरीवर 16000 कोटींचा अतिरिक्त भार वाढतो. चार दिवसांमध्ये याची सुरुवात झाली असून, सध्या हा आकडा 175 ते 180 कोटी रुपये इतक्यावर पोहोचला आहे. 

हेसुद्धा पाहा: lunar eclipse Video : ग्रहणातही सुंदरच दिसतो चंद्र; NASA नं सर्वात जवळून टीपले खास क्षण

 

तज्ज्ञांच्या मते इस्रायल, अमेरिका आणि इराण युद्धाचा परिणाम भारतावर आर्थिक स्वरुपात होत असून, इतरही प्रामुख्यानं आयात- निर्यातीवर अवलंबून असणाऱ्या देशांना या तणावामुळं फटका बसत आहे. सागरी आणि हवाई मार्गांवर दिसणारे अनिश्चिततेचे ढग मालवाहतुकीवर थेट परिणाम करत असल्यानं आणि हे संकट दीर्घकालीन असू शकतं असं प्रथमदर्शनी दिसत असल्यानं ही परिस्थिती आणखी बिकट होवू शकते याचीच भीती व्यक्त केली जात आहे. 

About the Author

Sayali Patil

सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'मधील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी 'एबीपी माझा' च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत. 

...Read More