Iran Israel War : अमेरिका- इस्रायलच्या तणावग्रस्त परिस्थितीमध्येच इराण मोठ्या संकटात असतानाच अनेक देशांच्या सीमासुद्धा हादरण्यास सुरुवात झाली आहे. फक्त हीच राष्ट्र नव्हे तर मध्यपूर्वेतून अनेक राष्ट्रांपुढं या परिस्थितीमुळं तणावात भर पडलेली असतानाच जगभरातून Supply Chain अर्थात पुरवठा साखळी प्रभावित झाली आहे. भारतावरही याचा थेट परिणाम झाला असून, प्रामुख्यानं भारत आणि मध्य आशियामध्ये असणाऱ्या अब्जावधी डॉलरच्या व्यापाराच्यावर परिणाम होत असल्याचं पाहून मोदी सरकारनं तातडीनं मोठी पावलं उचलण्यास सुरुवात केली.
सोमवारी केंद्रीय वाणिज्य मंत्रालयानं तातडीनं मोठी बैठक घेतली असून, यामध्ये युद्धादरम्यान निर्माण होणाऱ्या आर्थिक अडचणींचा सामना करण्यासाठी आराखडा आखण्याची तयारी या बैठकीमध्ये करण्यात आली. अर्थ विभागाचे विशेष सचिव सुचिंद्र मिश्रा आणि महासंचालक (DGFT) लव अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीमध्ये शिपिंग लाइन्स, पेट्रोलियम मंत्रालय, रिजर्व बँक (RBI) आणि सीमा शुल्क बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी हजेरी लावली होती. युद्धाची ही धग भारतीय व्यापारी बंदरं आणि व्यापारी तिजोरीपर्यंत पोहोचू नये यासाठी या बैठकीमध्ये सल्लामसलत करण्यात आली.
युद्धामुळं प्रभावित होणारा व्यापार पाहता या स्थितीमध्ये निर्यातीशी संबंधित मंजुरी आणि तत्सम प्रक्रिया अधिक सोपी करण्यावर भर देण्यात येईल. फळं, भाजीपाला, औषधं आणि ठराविक वेळेत खराब होणाऱ्या पदार्थांसाठी सीमा शुल्क विभागाच्या साथीनं 'फास्ट ट्रॅक क्लिअरन्स'ती व्यवस्था करण्यात येईल. निर्यातकांना कोणत्याची अडचणी होऊ नयेत यासाठी बँक आणि विमा संस्थांशी हातमिळवणी करत काम होईल, जहाजांच्या वेळापत्रकात झालेल्या बदलांच्या धर्तीवर कंटेनर कमी होऊ नयेत यासाठी पर्यायांची चाचपणी करण्यावर केंद्राकडून भर दिली जाईल.
युद्धामुळं सागरी मार्गांमध्ये मोठे बदल होत असून, जहाजांच्या प्रवासवेळा वाढल्या आहेत. ज्यामुळं मालवाहतूक जहाजांच्या प्रवासवेळा कमी करत प्रामुख्यानं मध्यम स्वरुपातील उद्योगांना याची झळ बसू न देता व्यापाऱ्यांच्या अधिकाऱ्यांच्या रक्षणासाठी केंद्र सरकार प्राधान्यानं प्रयत्नशील राहत क्षणोक्षणी त्याबाबतची माहिती देत राहील.
सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'मधील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी 'एबीपी माझा' च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत.
...Read More|
WI
(20 ov) 195/4
|
VS |
IND
199/5(19.2 ov)
|
| India beat West Indies by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
ZIM
(20 ov) 153/7
|
VS |
SA
154/5(17.5 ov)
|
| South Africa beat Zimbabwe by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
PAK
(20 ov) 212/8
|
VS |
SL
207/6(20 ov)
|
| Pakistan beat Sri Lanka by 5 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.