Iran US War: होर्मुझची सामुद्रधुनी ही जगातील महत्त्वाची तेल वाहतूक मार्ग आहे. इराणने ही धुनी बंद केल्यामुळे मोठी गर्दी झाली आहे. सध्या 706 इराणबाहेरील टँकर दोन्ही बाजूंना अडकले आहेत. मार्च महिन्यात तेल टँकरांची वाहतूक 80% पेक्षा जास्त कमी झाली आहे. 1 मार्चला फक्त तीन टँकर (2.8 दशलक्ष बॅरल तेल) आणि 2 मार्चला एक छोटा टँकर व एक छोटी मालवाहू जहाज पार झाली. इराण आणि अमेरिकेतील तणावामुळे घडत असल्याने जागतिक तेल बाजारात चिंता वाढलीय. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
अडकलेल्या 706 टँकरांपैकी 334 कच्च्या तेलाचे, 106 'डर्टी प्रॉडक्ट' (मळकट उत्पादने) आणि 263 'क्लीन प्रॉडक्ट' (स्वच्छ उत्पादने) आहेत. ही माहिती विंडवर्ड आणि केप्लर कंपनीच्या आकडेवारीवर आधारित आहे. या टँकरांची गर्दी पर्शियन गल्फच्या अरुंद प्रवेशद्वारावर आहे, जिथे दोन जहाजांवर हल्ले झाले आहेत. यामुळे निर्यात क्षमता प्रभावित झाली आहे.
इराणच्या क्रांतिकारी गार्ड्स आणि नौदलाने धुनी बंद केलीय. "धुनी बंद असून जो कोणी पार जाण्याचा प्रयत्न करेल, त्याच्या जहाजांना गार्ड्स आणि नौदलाचे सैनिक आग लावतील', असे कमांडर-इन-चीफचे सल्लागार इब्राहिम जबारी यांनी सांगितले. अमेरिका आणि इराणमधील संघर्षामुळे हा तणाव वाढलाय. पश्चिम आशियातील हल्ले सुरू राहिले तर तेल पुरवठा पूर्णपणे थांबू शकतो.
होर्मुझ धुनीतून दररोज सुमारे 15 दशलक्ष बॅरल कच्चे तेल जाते, जे जागतिक तेल पुरवठ्याच्या 20% आहे. रिस्टाड एनर्जी कंपनीने दिलेल्या माहितीनुसारस ही धुनी सौदी अरेबिया, कुवैत, इराक, कतार, बहरीन, यूएई आणि इराणच्या तेल आणि गॅस निर्यातीसाठी महत्त्वाची आहे. सध्या वाहतूक जवळपास थांबल्याने जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम होतोय.
ही धुनी जागतिक 'चोकपॉइंट' आहे, जिथे तेल आणि गॅसची मोठी वाहतूक होते. पश्चिम आशियातील संघर्ष सुरू राहिले तर कच्च्या तेलाच्या किंमती वाढू शकतात, ज्याचा परिणाम पेट्रोल-डिझेलच्या दरांवर होईल. हल्ले वाढले तर जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल, असे ऊर्जा तज्ञांनी म्हटलेय.
भारताच्या पेट्रोलियम मंत्रालयाने परिस्थितीवर लक्ष ठेवले आहे. मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांसोबत पुरवठा स्थितीचा आढावा घेतला. भारताकडे जागतिक संकटात 74 दिवस पुरेल इतका राखीव तेल साठा आहे. 'भारतासारख्या वेगाने विकसित होत असलेल्या देशांसाठी सुरक्षित तेल साठा आवश्यक आहे. ज्यामुळे जागतिक अशांततेतही अडचण येणार नाही', असे पुरी म्हणाले. या संकटामुळे भारतासह जगातील अनेक देशांना तेल पुरवठ्यात अडचणी येऊ शकतात. इराण आणि पश्चिम आशियाई देशांकडून तेल येणे कमी होईल.असे असले तरी पेट्रोलियम उत्पादने उपलब्ध आणि परवडणाऱ्या दरात मिळतील, अशी खात्री सरकारने जनतेला दिलीय.
"प्रवीण सुरेश दाभोळकर हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये चीफ सब एडीटर पदावर कार्यरत आहेत त्यांना मीडिया क्षेत्राचा 14 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल मीडियासह विविध माध्यमांमध्ये काम केले आहे. संशोधनात्मक अहवाल आणि फिचर रायटिंगकडे त्यांचा कल आहे. वाचकांना माहिती नसलेल्या कथा लोकांसमोर आणण्याची त्यांना आवड आहे. हे करीत असताना सविस्तर तपशील आणि अचूकतेकडे त्यांची कटाक्षाने नजर असते. फावल्या वेळात प्रविण आपल्या आनंदासाठी फिरणे, नवीन गोष्टी आत्मसात करणे आणि सामाजिक कार्यात गुंतलेले असतात. त्यांचे लेखन अनेकदा सामाजिक न्यायाच्या समस्यांबद्दलची त्यांची उत्कटता दर्शवते. तसेच आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात."
...Read More|
WI
(20 ov) 195/4
|
VS |
IND
199/5(19.2 ov)
|
| India beat West Indies by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
ZIM
(20 ov) 153/7
|
VS |
SA
154/5(17.5 ov)
|
| South Africa beat Zimbabwe by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
PAK
(20 ov) 212/8
|
VS |
SL
207/6(20 ov)
|
| Pakistan beat Sri Lanka by 5 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.