धक्कादायक : पुण्यात रेल्वे गाड्यांना रुळावरून पाडण्याचा प्रयत्न

पुण्यात रेल्वे गाड्यांना रुळावरून पाडण्याचा प्रयत्न होत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 

Updated: May 18, 2019, 10:20 AM IST
धक्कादायक : पुण्यात रेल्वे गाड्यांना रुळावरून पाडण्याचा प्रयत्न title=

पुणे : पुण्यात रेल्वे गाड्यांना रुळावरून पाडण्याचा प्रयत्न होत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या काही दिवसात पुणे रेल्वे विभागाअंतर्गत येणाऱ्या अनेक ठिकाणी रेल्वे रुळावर लोखंडी तुकडे ठेवून मोठा अपघात घडवून आणण्याचे प्रयत्न होत असल्याची धक्कादायक माहिती पुणे रेल्वे विभागाने दिली आहे. मागील 3-4 महिन्यात जवळपास 8 ते 10 वेळेस अशा प्रकारच्या घटना पुणे रेल्वे विभागात घडल्या आहेत. यासंदर्भात रेल्वे पोलिसांकडे तक्रार ही देण्यात आली आहे.

Image result for railway track zee news

सुदैवाने या सगळ्या घटनांमध्ये लोको पायलट व रेल्वे अधिकारी यांच्या सतर्कतेमुळे हे अपघात टाळण्यात रेल्वे विभागाला यश मिळालं आहे. एप्रिल महिन्यात हातकणंगले परिसरात दोन वेगवेगळया ठिकाणी अज्ञात लोकांनी लोखंडी तुकडे रेल्वे ट्रैक वर टाकून अपघात घडवून आणण्याचा प्रयत्न केला. काही दिवसांपूर्वीच तळेगावमध्ये कामशेत येथे हैद्राबाद मुबई एक्सप्रेसलादेखील टार्गेट करण्यात आले होते. 

हजारों लोकं दररोज़ पुणे रेलवे विभागात रेलवेने प्रवास करतात अशा प्रकारच्या घटनांमुळे त्यांच्या जिवाला धोका निर्माण होतोय. त्यामुळे रेल्वे प्रशासनानेदेखील आवाहन केले आहे की ज्यांना पण अशा प्रकारे रेल्वे रुळावर लोखंडी तुकडे ठेवणारे व्यक्ती किंवा संशायित कोणी दिसले तर लगेचच रेल्वे विभाग किंवा पोलिसांना कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.