बंद दाराआड अश्लिल चित्रफीत पाहणं, डाऊनलोड तसंच शेअर करणं गुन्हा आहे का? कायदा काय म्हणतो? वाचा

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्रा सध्या पॉर्न व्हिडिओ स्कॅंडलबाबत कायदेशीर कारवाईचा सामना करीत आहे. देशात पॉर्न चित्रपटांच्या बाबत जोरदार चर्चा सुरू आहेत. परंतु प्रश्न हा आहे की, भारतात पॉर्न चित्रपट पाहणे बेकायदेशीर आहे का? 

Updated: Aug 2, 2021, 01:34 PM IST
बंद दाराआड अश्लिल चित्रफीत पाहणं, डाऊनलोड तसंच शेअर करणं गुन्हा आहे का? कायदा काय म्हणतो? वाचा

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्रा सध्या पॉर्न व्हिडिओ स्कॅंडलबाबत कायदेशीर कारवाईचा सामना करीत आहे. देशात पॉर्न चित्रपटांच्या बाबत जोरदार चर्चा सुरू आहेत. परंतु प्रश्न हा आहे की, भारतात पॉर्न चित्रपट पाहणे बेकायदेशीर आहे का? 

बंद दाराआड पॉर्न चित्रपट पाहणे 
जर कोणतीही व्यक्ती बंद दाराआड लॅपटॉप किंवा मोबाईलवर पॉर्न चित्रपट पाहत असेल. तर हा गुन्हा नाही. देशाच्या सर्वोच्च न्यायालायाने 2015 मध्ये म्हटले होते की, वयस्क व्यक्ती बंद दाराआड पॉर्न फिल्म पाहत असेल तर, तो त्याचा खासगी अधिकार आहे.
परंतु भारतात चाइल्ड पॉर्नोग्राफी पाहणं बेकायदेशीर आहे. तसेच तुम्ही अश्लिल चित्रपट शेअर करीत आहात किंवा प्रकाशित करत आहात तुम्ही मोठा गुन्हा करीत आहात.

वेबसाईटवरून मोबाईलमध्ये सेव करणे आणि शेअर करणे गुन्हा
भारतात पॉर्न वेबसाईट्सला बंदी आहे. सरकारच्या अनेक प्रयत्नानंतरही अनेक वेबसाईट एडल्ट कंटेंट दाखवत आहेत. परंतु भारतात या साईट्सला बंदी असल्याने त्यावरील कंटेंट आपल्या मोबाईल किंवा लॅपटॉपमध्ये सेव करणे गुन्हा आहे. याशिवाय भारतात पॉर्न बनवणे आणि विकणे गुन्हा आहे. हा गुन्हा आयपीसी 292 अंतर्गत येतो.