मुंबई : लग्नाला काही वर्ष झाली की, नवरा बायकोमध्ये एकमेकांना बऱ्याच अंती समजू लागतात. एकमेकांच्या बऱ्याच गोष्टींची सवय झाल्याने म्हणा पण नात्यात एक सहजता आलेली असते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपला नवरा किंवा आपली बायको कुठल्या परिस्थितीत काय प्रतिक्रिया देईल याचा अंदाज आलेला असतो. याच गोष्टीला नाते चांगले मुरले असे म्हणतात. एकमेकांबरोबर कंफर्टेबल असलेले नवरा बायको कधी कधी काही वर्षांनी एकमेकांसारखे दिसू लागतात.


काही नवरा बायको तर इतके एकमेकांसारखे दिसू लागतात की ते बहीण भाऊ आहेत की काय असा संशय यावा! अर्थात याला कारणीभूत एकमेकांची बॉडी लँग्वेज, हावभाव सवयीने एकसारखे झाल्याने सुद्धा घडू शकते.



पण याबाबतीत प्रत्येकाच एकमत नाही. काहींना ही बाब अजिबात पटतही नसेल, तर काहींना ही गोष्ट पटते आहे. हे केवळ बघणाऱ्याच्या नजरेतच नाही आता तर विज्ञानाने सुद्धा सिद्ध केले आहे असं ही बोललं जात आहे. की लग्नानंतर अनेक वर्षांनी नवरा बायको एकमेकांसारखे दिसू लागतात.



युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया व बोस्टन युनिव्हर्सिटी स्कुल ऑफ पब्लिक हेल्थच्या नुकत्याच आलेल्या एका रिपोर्टनुसार रिसर्च करणाऱ्या एका संशोधकांच्या मते, जवळजवळ आतापर्यंत लोक आपापल्याच समाजातील किंवा ओळखीतील किंवा आसपासच्या समुदायातील लोकांशी लग्न करायचे. एकाच समाजातील लोकांचे किंवा एकाच स्थानिक समुदायाचे पूर्वज एकच असू शकतात.


अनेक पिढ्यांनी आपल्याशी मिळता जुळताच पती/पत्नी शोधण्यामुळे किंवा आपल्याच समाजातील मुलाशी/मुलीशी लग्न केल्याने एक जेनेटिक स्ट्रक्चर तयार झाले आहे. ज्यामुळे जेनेटिक्सवर परिणाम होऊ शकतो.”


हा रिपोर्ट PLOS genetics मध्ये प्रकाशित झाला होता. ह्या रिपोर्टमध्ये फ्रॅमिंगहम हार्ट स्टडीमधील (FHS ) गोऱ्या लोकांच्या तीन पिढ्यांवर संशोधन करण्यात आले होते. हे FHS संशोधन 1947 सालापासून सुरु झाले होते.


ह्यात सुरुवातीला फ्रॅमिंगहॅम मास येथील 30 ते 62 ह्या वयोगटातील पुरुष व स्त्रियांवर संशोधन करण्यात आले. यात 800 जोडप्यांच्या गुणसूत्रांचा अभ्यास करून त्यांचे पूर्वज कोण हे शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला.


प्रयोगादरम्यान संशोधकांनी जर्नलमध्ये असे नमूद केले आहे की, “जोडप्यांची गुणसूत्रे अभ्यासताना आम्हाला हे लक्षात आले की उत्तर/पश्चिम युरोप, दक्षिण युरोप येथील मूळ लोक व अश्कनाझी पूर्वज असलेले लोक हे सारखेच पूर्वज असलेला पार्टनर निवडत असत.



परंतु उत्तर/पश्चिम व दक्षिण युरोपियन लोकांच्या नंतरच्या पिढ्यांमध्ये एंडोगॅमी म्हणजेच स्वतःच्याच टोळीतील व्यक्तीशी विवाह करणे हे उत्क्रांती दरम्यान उत्तरोत्तर कमी होत गेले. 2010 साली युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगन येथे झालेल्या एका अभ्यासानुसार असेही सिद्ध करण्यात आले की लग्नानंतर नवरा बायको काही वर्षांनी एकमेकांसारखे दिसू लागतात त्याचा जेनेटिक्सशी काही संबंध नाही.



रॉबर्ट झाजोंक ह्या मानशास्त्रज्ञांनी काही जोडप्यांचे लग्नानंतरचे फोटो व त्यांच जोडप्यांचे 25 वर्षानंतरचे काही फोटो अभ्यासले. तेव्हा त्यांना असे आढळून आले की जस जसा काळ पुढे जातो तसे नवरा बायको एकमेकांसारखे दिसू लागतात.


याचं कारण नवरा बायको इतकी वर्षे एकमेकांबरोबर राहिल्याने एकमेकांचे चेहऱ्यावरील हावभाव नकळतपणे कॉपी करतात.