तुम्हाला दिवाळीत मिळणाऱ्या बोनसवर Tax लागतो का? जाणून घ्या IT Act काय सांगतो

दिवाळी जवळ येताच कर्मचाऱ्यांच्या मनात प्रश्न असतो की त्यांना यावर्षी किती बोनस मिळेल? पण तुम्हाला दिवाळीत मिळणाऱ्या बोनसवर Tex किती लागतो? अनेकांना ही महत्वाची गोष्ट माहितीच नाही. जाणून घ्या सविस्तर 

Updated: Oct 11, 2025, 07:43 PM IST
तुम्हाला दिवाळीत मिळणाऱ्या बोनसवर Tax लागतो का? जाणून घ्या IT Act काय सांगतो

Diwali Bonus:दिवाळी हा हिंदू धर्मातला असा एक महत्त्वाचा सण आहे जो संपूर्ण भारतभर साजरा केला जातो.  हा सण म्हणजे उत्साह, आनंद आणि  कर्मचाऱ्यांनासाठी बोनसची ओढ. नोकऱ्या करणाऱ्या वर्गाच्या दिवाळीत गोडी ही मिठाई ने नाही तर बोनसने येते  पण अनेक कर्मचाऱ्यांना अजूनही माहिती नाही की त्यांच्या दिवाळी बोनसवरही उत्पन्न कर (Income Tax) लागू शकतो. सणासुदीच्या भेटवस्तू आणि बोनस यामध्ये फरक समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे.

Add Zee News as a Preferred Source

गिफ्ट्सवर लागतो का कर?
जर कंपनीकडून तुम्हाला मिठाईचा बॉक्स, कपडे, गॅजेट किंवा इतर भेटवस्तू मिळाल्या आणि त्यांची किंमत ₹5,000 पर्यंत असेल, तर त्या पूर्णपणे करमुक्त (Tax Free) आहेत. पण गिफ्टची किंमत ₹5,000 पेक्षा जास्त असल्यास, त्यावर कर लागतो.

बोनसवर काय नियम आहेत?
कंपनीकडून मिळणारा रोख बोनस (Cash Bonus) हा तुमच्या पगाराचा एक भाग मानला जातो. उदाहरणार्थ, तुम्हाला ₹30,000 बोनस मिळाला, तर त्या रकमेवर तुमच्या पगारासारखाच कर (TDS) लागतो. बोनससाठी कोणतीही वेगळी कर सूट मिळत नाही. त्यामुळे बोनस ITR मध्ये दाखवणे अत्यावश्यक आहे; नाहीतर पुढे Income Tax Department नोटीस पाठवू शकतो.

नवीन कर प्रणाली 2025 नुसार दर

₹0 ते ₹4 लाख – कर नाही

₹4 ते ₹8 लाख – 5%

₹8 ते ₹12 लाख – 10%

₹12 ते ₹16 लाख – 15%

₹16 ते ₹20 लाख – 20%

₹20 ते ₹24 लाख – 25%

₹24 लाखांपेक्षा जास्त – 30%

दिवाळी बोनसचा आनंद घेताना कराचे नियम समजून घेणे तितकेच आवश्यक आहे. लक्षात ठेवा — ₹5,000 पेक्षा कमी किंमतीचे गिफ्ट्स करमुक्त आहेत, पण रोख बोनस नेहमी करपात्र असतो. त्यामुळे सण साजरा करा मनसोक्त, पण कराच्या जबाबदाऱ्या विसरू नका! 

 

About the Author