ISRO ची कमाई पाहून जग अचंबित; 34 देशांचे 393 सॅटेलाईट लाँच करुन कमावले 12434843850 रुपये

भारतीय अवकाश क्षेत्रात खाजगी कंपन्या आणि स्टार्टअप्सचा सहभागही वेगाने वाढत आहे. यामुळे जगभरात ISRO चा दबदबा वाढला असून सॅटेलाईट लाँच करुन इस्त्रोने  12434843850 रुपयांची कमाई केली आहे.  

वनिता कांबळे | Updated: Mar 18, 2025, 06:45 PM IST
ISRO ची कमाई पाहून जग अचंबित; 34 देशांचे 393 सॅटेलाईट लाँच करुन कमावले 12434843850 रुपये

ISRO : भारतीय अंतराळ संस्था अर्थात  ISRO ची कमाई पाहून जग अचंबित झाले आहे. जगभरात  ISROचा दबदबा आहे. स्पेस क्षेत्रात  ISRO ने आपली वेगळी ओळख केली आहे. 34 देशांचे 393 सॅटेलाईट लाँच करुन  इस्त्रोने नवा विक्रम रचला आहे. इतकचं नाही तर, 393 सॅटेलाईट लाँच करुन इस्त्रोने 12434843850 रुपये कमावले आहेत. 

2015 ते 2024 दरम्यान परदेशी उपग्रह प्रक्षेपित करून भारताने 143 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजेच  12 अब्ज भारतीय रुपयांपेक्षा जास्त किमतीचे परकीय चलन कमावले आहे. अंतराळ क्षेत्राचे प्रभारी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत ही महिती दिली. जानेवारी 2015 ते डिसेंबर 2024 या गेल्या दहा वर्षांत, इस्रोने त्यांच्या PSLV, LVM3 आणि SSLV रॉकेटद्वारे 393 परदेशी उपग्रह आणि तीन भारतीय ग्राहक उपग्रह प्रक्षेपित केले आहेत. 

आतापर्यंत भारताने 34 देशांचे उपग्रह प्रक्षेपित केले आहेत. यामध्ये अमेरिकेचे 232, ब्रिटनचे 83, सिंगापूरचे 19, कॅनडाचे 8, दक्षिण कोरियाचे 5, लक्झेंबर्ग आणि इटलीचे प्रत्येकी 4 आणि जर्मनी, फ्रान्स, बेल्जियम आणि फिनलंडचे प्रत्येकी 3 उपग्रहांचा समावेश आहे. याशिवाय जपान, इस्रायल, स्पेन, ऑस्ट्रेलिया, संयुक्त अरब अमिराती आणि ऑस्ट्रियाचे उपग्रहही प्रक्षेपित करण्यात आले आहेत.

जगात भरात एक मोठी अंतराळ शक्ती बनला आहे. 2023 मध्ये भारताने दोन मोठे यशस्वी प्रयोग करत जग भरात आपली कामगिरी सिद्ध करुन दाखवली. चांद्रयान-३ ने चंद्राच्या दक्षिण भागात यशस्वीरित्या सॉफ्ट लँडिंग करून इतिहास रचला. दुसरा प्रयोग  म्हणजे आदित्य-एल१ हे भारताचे पहिले सौर मिशने आहे. जे सूर्याचा अभ्यास करत आहे.

भारत आता गगनयान मोहिमेची तयारी करत आहे. या मोहिमेअंतर्गत भारतीय अंतराळवीरांना अंतराळात पाठवले जाणार आहे तसेच त्यांना सुरक्षितपणे परत आणले जाणार आहे. या मोहिमेसाठी निवडलेल्या चार भारतीय अंतराळवीरांना रशियातील युरी गागारिन प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण देण्यात आले आहे. याच केंद्रात 1984 मध्ये पहिले भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा यांनीही प्रशिक्षण घेतले होते.  2035 पर्यंत भारताचे स्वतंत्र अंतराळ स्थानक असेल. 2040 पर्यंत पहिला भारतीय चंद्रावर पाठवण्याचे इस्त्रोचे टार्गेट आहे.