थोडीच प्रतीक्षा अन् 'या' वर्षात भारतीयांचं पाऊल थेट चंद्रावर; ISRO प्रमुख स्पष्टच बोलले...

Gaganyaan Man on moon Mission: अमेरिका, चीनपुढं भारत वरचढ! इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं संपूर्ण जगाचं लक्ष वेधणारे संकेत दिले आहेत...   

सायली पाटील | Updated: Oct 16, 2025, 09:47 AM IST
थोडीच प्रतीक्षा अन् 'या' वर्षात भारतीयांचं पाऊल थेट चंद्रावर; ISRO प्रमुख स्पष्टच बोलले...
isro laundes mission Gaganyaan Space date human on mooon mission latest update

Gaganyaan Man on moon Mission: इस्रोच्या चांद्रयान मोहिमेला मिळालेल्या यशानंतर आता भारतातील ही अंतराळ संशोधन संस्था आता एका नव्या मोहिमेच्या तयारी असल्याचं दिसत आहे. खुद्द इस्रो प्रमुख व्ही. नारायणन यांनी नुकतंच भारतातील अतीव महत्त्वाच्या अवकाश मोहिमेसंदर्भातील माहिती जाहीर केली आहे. उपलब्ध माहितीनुसार नारायणन यांच्या माहितीनुसार भारतातील पहिलं मानवाला घेऊन जाणारं अवकाशयान, गगनयान 2027 मध्ये प्रक्षेपणासाठी तयार असेल. 

Add Zee News as a Preferred Source

नारायणन यांच्या माहितीनुसार सध्या भारत जगातील 9 अग्रगणी अंतराळ संशोधन संस्थामध्ये समाधानकारक स्थानी असून, यामध्ये इस्रोच्या चांद्रयान 1 पासून ते अगदी चांद्रयान 3 मोहिमेचाही सहभाह आहे. ज्या मोहिमेमध्ये चंद्रावरील दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा पहिलाच देश ठरला होता. इस्रोच्या कामाची गती आणि यश पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2040 पर्यंत पहिल्या मानवयुक्त चंद्र मोहिमेचं महत्त्वाकांक्षी लक्ष्य निर्धारित केली आहे. ज्यामुळं आता नागरिकांनाही चंद्रापर्यंतचा प्रवास घडवण्याचा मानस इस्रोच्या दृष्टीक्षेपात असल्याचं म्हटलं जात आहे. 

इस्रोनं 34 देशांच्या उपग्रहांना... 

नारायणन यांनी इस्रोच्या चंद्र मोहिमेसमवेत इतरही काही मोहिमांची माहिती दिली. जिथं भारत शास्त्रीय आणि राजकीय प्राथमिकतांच्या आधारे इतर राष्ट्रांसमवेत आंतरराष्ट्रीय स्तरावर सहकार्यपर भूमिका घेण्यासाठी सज्ज असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी आदित्य एल1 मोहिमेची माहिती देत या मोहिमेतून आतापर्यंत 15 टेराबिटहून अधिक डेटा मिळाल्याचं नारायणन यांनी सांगितलं. यादरम्यान देशानं 34 देशांचे 433 उपग्रह यशस्वीरित्या प्रक्षेपित केले असून, आर्थिकदृष्ट्या ही मोठी बाब आहे. इस्रो आगामी काळात महत्त्वाकांक्षी मोहिमांसाठी 80000 किलोग्राम वजनाला पृथ्वीच्या खालील दिशेला असणाऱ्या कक्षेपर्यंत नेणाऱ्या रॉकेटची निर्मिती करण्यावर लक्ष केंद्रीत करेल. 

हेसुद्धा वाचा : मुंबईत गुन्हा, तब्बल 48 वर्षांनंतर फरार आरोपीला कोकणालीत 'या' गावातून अटक; गुन्ह्याचाही विसर... घटनाक्रम पाहाच! 

दरम्यान इस्रोनं भारताच्या गगनयान मोहिमेसंदर्भातील एक महत्त्वाचा पॅराशूच व्हिडीओसुद्धा जारी केला. ज्यामध्ये ड्रोन पॅराशूट, एका परिक्षण कॅप्सूलच्या माध्यमातून अतिप्रचंड वेगानं पुढे जातना दिसला. जेणेकरून पुन:प्रवेशादरम्यान क्रू मॉड्यूलचा वेग कमी करण्यात आणि स्थिर ठेवण्यात त्याच्या असणाऱ्या योगदानासंदर्भात खात्री करून घेतली जाईल. 

FAQ

गगनयान मोहीम कधी लॉन्च होणार? 
इस्रो प्रमुख व्ही. नारायणन यांच्या माहितीनुसार, भारताची पहिली मानवयुक्त अवकाश मोहीम गगनयान 2027 च्या पहिल्या तिमाहीत लॉन्च होण्यासाठी तयार आहे.

गगनयान मोहीम कधी लॉन्च होणार? त्याबाबत इस्रो प्रमुख काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टिकोनानुसार, 2040 पर्यंत भारताची पहिली मानवयुक्त चांद्र मोहीम होईल. इस्रो जगातील 9 अग्रगण्य अवकाश संशोधन संस्थांमध्ये समाविष्ट आहे, ज्यात चांद्रयान-1 ते चांद्रयान-3 चा समावेश आहे. 

गगनयानसाठी पॅराशूट चाचणी व्हिडिओबाबत काय?
इस्रोने गगनयानसाठी पहिली एकात्मिक एअर ड्रॉप टेस्ट (IADT-01) 24 ऑगस्ट 2025 रोजी यशस्वी केली, ज्यात ड्रोन पॅराशूट आणि टेस्ट कॅप्सूलचा वापर करून क्रू मॉड्यूलचा वेग कमी करण्याची क्षमता तपासली गेली. 

About the Author

Sayali Patil

सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'मधील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी 'एबीपी माझा' च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत. 

...Read More