जबलपूर: मध्यप्रदेशातील नर्मदा कुंभाची स्थापना करणारे जगतगुरूदेव डॉ. श्याम देवाचार्य महाराज यांचे कोरोना विषाणूच्या संसर्गाने निधन झाले.  देवाचार्य महारारज यांनी कोरोना प्रतिबंधक लशीचे दोन्ही डोस घेतले होते. त्यानंतर ते हरिद्वार येथील कुंभ मेळ्यात सहभागी झाले होते.  त्यांच्या निधनानंतर संत समाजात शोककळा पसरली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नरसिंह मंदिराचे प्रमुख महामंडलेश्वर देवाचार्य महाराजांच्या निधनानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शोक व्यक्त केला आहे. ट्वीटच्या माध्यमांतून त्यांनी आपली भावना व्यक्त केली आहे.


देवाचार्य महाराजांनी कोरोना प्रतिबंधक लशीचे दोन्ही डोस घेऊन देखील त्यांचे निधन झाले आहे. दोन्ही डोस घेतल्यानंतर ते हरिद्वार येथील कुंभ मेळ्यात सहभागी झाले होते.


कुंभमेळ्यातील गर्दीमुळे त्यांना कोरोना विषाणूची लागण झाली. आजारपण वाढत गेले. परंतु त्यांना तातडीने उपचार मिळू शकले नाही. शुक्रवारी (16 एप्रिल ) ला त्यांनी अखेरचा श्वास घेतला.