)
Jaipur News : गॅस सिलेंडर हा एक प्रकारचा जिवंत बॉम्ब आहे अशा शब्दांत अनेकदा सूचित केलं जातं. सतर्कतेचा इशारा दिला जातो. तो नेमका का? जर चुकूनही या सिलेंडरचा स्फोट झाला तर नेमकं काय होईल, याचं दाहक वास्तव दाखवणारी आणि काळजाचा थरकाप उडवणारी घटना नुकतीच घडल्याचं पाहायला मिळालं. जिथं राष्ट्रीय महामार्गावर शेकडो सिलेंडरचा एकामागून एक स्फोट झाला आणि युद्धादरम्यान तोफगोळ्यांच्या स्फोटानं होतो इतका भयंकर आवाज अन् आगीचे लोट घटनास्थळी पाहायला मिळाले. सोशल मीडियावर अनेकांनीच या भीषण प्रसंगाचे व्हिडीओ शेअर केल्यानंतर तेथील विचलित करणारी दृश्य हादरवून गेली.
जयपूरमध्ये ही भीषण दुर्घटना घडली असून जयपूर अजमेर राष्ट्रीय महामार्गावर एकापाठोपाठ एक तब्बल 200 सिलेंडरचा स्फोट झाल्याचं धक्कादायक वृत्त समोर आलं. गॅस सिलेंडर नेणाऱ्या ट्रकला झालेल्या अपघातामुळे हे स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली. या स्फोटांची तीव्रता इतकी भीषण होती की 10 किलोमीटर अंतरापर्यंत स्फोटांचे आवाज ऐकू येत होते. या दुर्घटनेत ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर, सिलेंडर स्फोटानंतर लागेल्या आगीत इतर पाच वाहनंही आगीच्या विळख्यात सापडली.
जयपुर-अजमेर हाईवे पर गैस से भरे टैंकर के पलटने से बड़े हादसे की खबर अत्यंत दुखद, भयावह और हृदयविदारक है।
सावरदा पुलिया, दूदू के पास हुई यह घटना दिल को दहला देने वाली है।
यह दृश्य बेहद भयावह है #jaipurajmerhighway #Rajasthan pic.twitter.com/TYv9TQ7msf
— RAJASTHAN AKKIANS (@RajasthanAkkian) October 8, 2025
LPG गैस सिलेंडर से भरे ट्रक में लगी आग: जयपुर-अजमेर हाईवे पर ट्रेलर ने मारी टक्कर, लगातार हो रहे धमाके, 7 गाड़ियां आई चपेट में#JaipurAjmerHighway #RoadAccident #LPGTruckBlast #HighwayAccident #RajasthanNews #CylinderBlast pic.twitter.com/HLBaJfePyx
— A Ahmed (@_AAhmed004) October 7, 2025
जयपुर-अजमेर हाईवे पर सावरदा पुलिया (दूदू) के पास गैस से भरे टैंकर के पलटने से बड़ा हादसा हो गया। हादसे के बाद इलाके में अफरातफरी का माहौल है और राहत-बचाव कार्य जारी है। स्थानीय प्रशासन, पुलिस और आपदा प्रबंधन दल मौके पर पहुंच चुके हैं। #JaipurAjmerHighway #dudu #rajasthan pic.twitter.com/KbLsA4a3Le
— Sushil K Yati (@SushilYati) October 7, 2025
जयपूर अजमेर राष्ट्राय महामार्गावर असणाऱ्या दूदू नामक ठिकाणाजवळील मौजमाबाद इथं हा अपघात घडला. ज्यामध्ये एलपीजी सिलेंडर असणारा एक ट्रक रस्त्याच्या कडेलाच असणाऱ्या महादेव ढाबा इथं उभा होता. तेव्हाच प्रचंड वेगानं येणाऱ्या टँकरनं या ट्रकला मागून धडक दिली. या अपघातानं निर्माण झालेल्या उर्जेतून ठिणग्या उडताच ट्रक आणि टँकरला आग लागली. धडक दिलेल्या टँकरमध्ये रसायन असल्यानं त्यानंही पेट घेतला आणि आगीचा भडका उडाला.
मंगळवारी रात्री उशिरा साधारण 10 वाजून 15 मिनिटांनी हा अपघात झाला. या घटनेची तीव्रता इतकी होती,की मदतीसाठी कोणी पुढेही सरसावू शकलं नाही. एकामागून एक सिलेंडरचे स्फोट होत होते आणि हे सिलेंडर हवेत भिरकावले जात होते. ही आग आटोक्यात आणण्यासाठी घटनास्थळी अग्निशामक दलाची वाहनं आली आणि जवळपास अडीच तासांच्या अथक परिश्रम, प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं. आगीच्या भक्ष्यस्थानी आलेला ट्रक अक्षरश: मेणासारखा वितळला होता, ही दृश्य पाहणाताना अनेकांनाच धक्का बसला.
सिलेंडर ट्रकचा चालक ढाब्यावर जेवण्यास बसला असतानाच हा अपघात झाला. ज्यामध्ये रसायनांनी भरलेल्या टँकर वाहनात दोन व्यक्ती होत्या. त्यातील एका व्यक्तीला बाहेर काढण्यात आलं. दुसरी व्यक्ती मात्र केबिनमध्ये अडकल्यानं घटनास्थळीच त्यांचा मृत्यू ओढावला. या दुर्घटनेत चारजण जखमी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली.
घटनेनंतर बचावकार्यातील कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्यावेळी टँकरचं केबिन पाहण्यात आलं तेव्हा तिथं फक्त एक मानवी सापळा दिसला. अर्थात तिथं असणाऱ्या व्यक्तीचा जिवंतपणीच होरपळून मृत्यू ओढावला हे मन सुन्न करणारं वास्तव समोर आलं. ज्यानंतर हे अवशेष एका पिशवीतून रुग्णालयात डीएनए चाचणीसाठी पाठवण्यात आले. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार इथं साधारण 70 हून अधिक मोठे स्फोट झाले आणि एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं.
ही घटना कुठे घडली?
घटना जयपूर-अजमेर महामार्गावर दूडू जवळील मुजम्माबाद परिसरात घडली. अपघातामुळे महामार्गावर वाहतूक काही तासांसाठी बंद झाली.
जयपूरमधील गॅस सिलेंडर स्फोटाची नेमकी घटना काय घडली?
7 ऑक्टोबर 2025 च्या रात्री जयपूर-अजमेर राष्ट्रीय महामार्गावर एलपीजी सिलेंडर भरलेल्या ट्रकचा एका टँकरशी (रासायनिक टँकर) अपघात झाला. अपघातानंतर ट्रकला आग लागली आणि त्यातून 100 ते 200 सिलेंडर्सचे साखळी स्फोट झाले.
या स्फोटात किती लोक मृत्यूमुखी पडले आणि इतर परिणाम काय?
ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला. इतर कोणत्याही मृत्यूची माहिती अद्याप समोर आलेली नाही, परंतु स्फोटानंतर लागलेल्या आगीत पाच इतर वाहनेही जळून खाक झाली.