Pahalgam Terror Attack: 'तुम्ही तात्काळ निघा,' नरेंद्र मोदींचा सौदीतून थेट अमित शाहांना फोन, म्हणाले 'तिथे जाऊन...'

Pahalgam Terror Attack: जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणांची चिंता वाढली आहे. दरम्यान परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अमित शाह घटनास्थळी रवाना झाले आहेत.  

शिवराज यादव | Updated: Apr 22, 2025, 08:29 PM IST
Pahalgam Terror Attack: 'तुम्ही तात्काळ निघा,' नरेंद्र मोदींचा सौदीतून थेट अमित शाहांना फोन, म्हणाले 'तिथे जाऊन...'

Pahalgam Terror Attack: जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणांची चिंता वाढली आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात 26 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भिती व्यक्त होत आहे. दरम्यान जखमींमध्ये महाराष्ट्रातील काही पर्यटकांचाही समावेश असल्याचं समजत आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेशात असून त्यांनी तेथून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी संपर्क साधला आहे. त्यांनी अमित शाह यांनी घटनास्थळी जाण्यास सांगितलं आहे. त्यानंतर अमित शाह विशेष विमानाने जम्मू काश्मीरला रवाना झाले आहेत.

मोदींनी दहशतवादी हल्ल्याचा केला निषेध

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे. पंतप्रधानांनी लिहिले की, 'ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्याबद्दल माझ्या संवेदना आहेत. या भयानक हल्ल्यामागे जो कोणी असेल त्याला शिक्षा होईल, त्यांना सोडले जाणार नाही. दहशतवादाविरुद्धच्या लढाईची आमची वचनबद्धता अढळ आहे आणि ती आणखी मजबूत होईल.

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे. पंतप्रधानांनी शहा यांना योग्य ती कारवाई करण्यास सांगितले आहे.पंतप्रधानांनी शाह यांना घटनास्थळी भेट देण्यास सांगितले आहे. दुसरीकडे, शाह यांनी आपत्कालीन बैठक बोलावली आहे. ज्यामध्ये आयबीचे गृहसचिव आणि गृह मंत्रालयाचे इतर अधिकारी उपस्थित होते. जम्मू आणि काश्मीरचे डीजीपी या बैठकीत व्हर्च्युअल पद्धतीने सामील झाले. दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत एकाचा मृत्यू झाला आहे.

मोदी आणि अमित शाहांमध्ये नेमकं काय बोलणं झालं?

पंतप्रधान सध्या सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर आहेत. फोनवरून झालेल्या संभाषणादरम्यान, पंतप्रधानांनी अमित शाह यांना सर्व योग्य पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. पंतप्रधानांनी अमित शाह यांना घटनास्थळी भेट देण्यास सांगितलं आहे. यानंतर अमित शहा केंद्रशासित प्रदेशाकडे रवाना झाले आहेत.

पहलगामच्या बैसरण येथे दुपारी अडीच वाजता ही दहशतवादी घटना घडली. जेव्हा घोडेस्वारी करणारे पर्यटक डोंगराच्या माथ्यावर होते. त्यानंतर अचानक दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. पर्यटकांना सावरण्याची संधीही मिळाली नाही.