जम्मू-काश्मीर : सतत जीववर उदार होऊ मायभूमीचं रक्षण करणाऱ्या आपल्या जवानांनी  रविवारी साऱ्या जगासमोर एक  मानवतेचं एक नवं उदाहरण घालून दिलंय.  छातीवर गोळ्या येत असतानाही एका आईला दिलेलं वचन काश्मीरमध्ये तैनात राष्ट्रीय रायफलच्या जवानांनी  पाळलंय. काश्मीरमध्ये ज्या लष्कराच्या जवानांवर काश्मीरमध्ये दडगफेक होते... वाट चुकलेले काश्मीर तरुण ज्या लष्करला आपला शत्रू मानतात... त्याच काश्मीरमधल्या भारतीय लष्कराच्या जवानांनी मानवतेचं एक नवं उदाहरण जगासमोर ठेवलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काश्मीरमध्ये दहशतवाद्याच्या मार्गावर गेलेल्या एका स्थानिक तरुणाच्या कुटुंबाला दिलेलं जिवंत पडकण्याचं वचन पाळलंय. ५० राष्ट्रीय रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर कर्नल समर राघव यांनी ही माहिती दिलीय. 


लष्काराकडून दहशतवाद्याला जीवदान


रविवारी रात्री सुरक्षा त्राल जिल्ह्यातल्या खेव गावात दोन दहशतवादी लपल्याची बातमी लष्कराला मिळाली. बातमी मिळाल्यावर लष्कराच्या जवानांनी परिसर घेरला. चकमक सुरू झाली. जैश ए मोहम्मदचा एक पाकिस्तानी दहशतवादी मारला गेला. पण त्याचा स्थानिक साथीदार सोहेल लोन याला मात्र जिवंत पकडलं. 


वाट हरवलेले तरुण


सोहेल लोन याच वर्षी जुलैत घरातून अचनाक बेपत्ता झाला. तो जैश ए मोहम्मदमध्ये सामील झाल्याची माहिती पुढे आली. त्यानंतर त्याच्या आईवडिलंनी  त्याला परतण्याचं आवाहन केलं होतं. 


आईच्या आवाहनाचा तिच्या मुलावर काही परिणाम झाला नाही... पण जन्मभूमीचं रक्षण करणाऱ्या वीर सुपुत्रांनी या मातेची आर्त हाक ऐकली. समोरून सोहेल गोळीबार करत होता... पण जवानांनी त्याची पर्वा केली नाही... सोहेलला जिवंत पकडलं... आणि शांतीच्या मार्गानं जायचं असेल तर लष्कर केव्हाही तयार आहे असा संदेशही यानिमित्तानं काश्मीरी जनतेला दिला.