AI Job News : गेल्या काही काळापासून जागतिक आर्थिक मंदी आणि तत्सम कारणांनी नोकरदार वर्गातील अनेकांनीच आपल्या नोकऱ्या गमावल्या. बदलणारं तंत्रज्ञान, वैज्ञानिकांकडून सुरू असणारं संशोधन आणि मानवी बुद्धिमत्तेऐवजी आता वापरली जाणारी कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI चा वाढता वापर हे नोकऱ्या गमावण्यामागचं मुख्य कारण ठरलं. मागील काही महिन्यांमध्ये एआयचा वापर इतका वाढला आहे, की अनेकांच्याच जीवनात हे एआय प्रकरण एक अविभाज्य भाग होताना दिसत आहे.
मुळात नोकरी ही संकल्पनाच AI मुळं बदलली असून, त्यामुळं आता कौशल्याची परिभाषासुद्धा बदलताना दिसत आहे. 'गोल्डमॅन सॅक्स'च्या अनुभवानुसार 2030 पर्यंत जगभरातून 300 मिलियन नोकऱ्या एआयमुळं प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या प्रभावित होऊ शकतात. यामुळं लाखो युवांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. अशा परिस्थितीत करिअरसाठी कोणता पर्याय जोखमीचा नसेल? हा प्रश्नसुद्धा सातत्यानं उपस्थित केला जाऊ शकतो.
जिथंतिथं एआयचाच वापर केला जात असतानाच काही कामं किंवा क्षेत्र त्यामधील मानवी कौशल्य आणि गुणांमुळं ओळखली जाता. जिथं सातत्यानं नवी कलात्मकता गरजेती असते. IDPच्या AI-सेफ डिग्रीज अब्रॉडच्या अहवालानुसार ह्यूमन-सेंटर्ड करिअरमुळं ऑटोमेशनपासूनच सुरक्षितता मिळत नाही, तर आर्थिक सुरक्षितताही मिळते.
शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्यांसाठी ही माहिती अतिशय महत्त्वाची. कारण, 2025 मध्ये भारतात 15 लाख विद्यार्थी बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाले. ही आकडेवारी पाहता नव्या पिढीपुढे भवितव्य घडवण्यासाठी नेमकं कोणत्या वाटेवर जावं हा मोठा प्रश्न उभा राहत आहेत. याचं उत्तर आहे खालील पर्याय. जिथं मानवी योगदानच महत्त्वाचं असून AI नं कितीही प्रगती केली तरीसुद्धा नोकऱ्यांवर मात्र टांगती तलवार येण्याची शक्यता जवळपास नाहीत.
सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'मधील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी 'एबीपी माझा' च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत.
...Read More|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.