नवी दिल्ली : नोकरीच्या शोधात असलेल्या तरूणांसाठी आनंदाची बातमी आहे. दिल्ली मेट्रो कॉरपोरेशनमध्ये विभिन्न पदांसाठी जागा रिक्त आहेत. डीएमआरसीमध्ये असिस्टेंट मॅनेजरपासून ज्युनियर इंजिनीयरपर्यंत अनेक जागांपर्यंत नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. इच्छूक उमेदवार १ फेब्रुवारीपासून ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख २६ फेब्रुवारी आहे. उमेदवार आपला अर्ज डीएमआरसीच्या ऑफिशियल वेबसाईट delhimetrorail.com/careers वर करू शकतात.


अर्ज करण्यासाठी या आहेत अटी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्व अर्ज करण्यासाठी वयाची मर्यादा १ जानेवारीपर्यंत १८-२८ च्या मध्ये असायला हवी. इंजिनियरींगमध्ये असिस्टेंट मॅनेजर पदासाठी उमेदवारला GATE 2017 ची परिक्षा पास होणे गरजेचे आहे. बाकी पदांसाठी कोणत्याही मान्यताप्राप्त युनिवर्सिटीमधून एमबीएची पदवी घेतलेली असणे अनिवार्य आहे. अर्ज करण्यापूर्वी नियम आणि अटी जरूर वाचा.


निवड कशाच्या आधारावर होणार?


उमेदवारांची निवड कंम्प्युटर बेस टेस्टच्या आधारावर होईल. एक्जिक्यूटिव पदासाठी निवड होण्यासाठी तीन प्रक्रियातून जावे लागेल. ज्यात कंम्प्युटर बेस टेस्ट, ग्रुप डिस्कशन आणि मुलाखतीसोबत मेडिकल टेस्टला ही सामोरे जावे लागेल. नॉन एक्जीक्यूटिव पदासाठी निवडप्रक्रिया दोन स्तरात असेल. यात कंम्प्युटर बेस टेस्ट आणि मेडिकल टेस्टला सामोरे जावे लागेल.


कोणत्या पदासाठी आहे नोकरी?


एक्जिक्यूटिव कॅटेगेरीमध्ये वेगवेगळ्या फिल्डच्या असिस्टेंट मॅनेजर आणि नॉन-एक्जिक्यूटिव कॅटेगरीमध्ये ज्युनिअर इंजिनीयर, असिस्टेंट प्रोग्रामर, लीगल असिस्टेंट, फायर इंस्पेक्टर, लायब्रेरियन, ऑफिस असिस्टेंट, स्टोर असिस्टेंट पदासाठी नोकऱ्या आहेत.
इच्छूक उमेदवारांनी delhimetrorail.com/Career.aspx वेबसाईटवर अर्ज करा.


वयोमर्यादा


वय वर्ष १८-२८ ही वयोमर्यादा आहे. १ जानेवारी २०१८ पर्यंत हे वय असलेले उमेदवार अर्ज करु शकतात. 


अंतिम तारीख


२६ फेब्रुवारी २०१८ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.