Kedarnath Helicopter Crash: केदारनाथमध्ये भल्या पहाटेच मोठी दुर्घटना! भाविकांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर कोसळले, 5 जण ठार

Kedarnath Helicopter Crash: केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर क्रश झाल्यानंतर 5 जणांचा मृत्यू

दिक्षा पाटील | Updated: Jun 15, 2025, 08:37 AM IST
Kedarnath Helicopter Crash: केदारनाथमध्ये भल्या पहाटेच मोठी दुर्घटना! भाविकांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर कोसळले, 5 जण ठार
(Photo Credit : Social Media)

Kedarnath Helicopter Crash: उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यातील गौरीकुंड परिसरात रविवारी सकाळी एक दु:खद घटना घडली आहे. केदारनाथ धामला जात असलेलं एक हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती समोर आली आहे. या हेलिकॉप्टरमध्ये एकूण पाच जण होते आणि दुर्दैवानं पाचही जणांचा मृत्यू झाला आहे.

ही घटना रविवारी म्हणजेच 15 जुन रोजी पहाटे सुमारे 5.30 वाजता घडली असून आर्यन कंपनीचं हे हेलिकॉप्टर होतं. अपघाताचं मुख्य कारण खराब हवामान असल्याचे सांगितलं जात आहे. हे हॅलिकॉप्टर गौरीकुंड आणि त्रिजुगीनारायण मार्गात ही घटना घडली आहे. गौरीकुंडच्या वर गवत कापणाऱ्या नेपाळी वंशाच्या महिलांनी हेलिकॉप्टर अपघाताची माहिती दिली. त्यांनी माहिती देताच लगेच घटना स्थळी एनडीआरएफ आणि एसडीआरएफ टीम रवाना करण्यात आल्या. 

या अपघातात मृत्यू झालेल्या लोकांचे पार्थीवर जळाल्याचे म्हटले जात आहे. हेलिकॉप्टर क्रॅशची माहिती नोडल अधिकारी राहुल चौबे आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नंदन सिंह रजवार यांनी दिली आहे. 

याआधी, 8 मे रोजी उत्तरकाशी जिल्ह्यातही असाच एक हेलिकॉप्टर अपघात झाला होता. त्यावेळी पायलटसह सहा जणांचा मृत्यू झाला होता आणि एक जण गंभीर जखमी झाला होता. त्याला नंतर एम्स ऋषिकेशला दाखल करण्यात आले होते. तर यंदाच्यावर्षी वेगवेगळ्या धामांवर अनेक हेलिकॉप्टर क्रॅश झालं. त्यासोबत अनेक हेलिकॉप्टरची एमरजंसी लॅन्डिग करण्यात आली. काही दिवसांपूर्वी रस्त्यावर हेलिकॉप्टरची लॅन्डिंग करण्यात आली होती. तर चारधाम यात्रेची सुरुवातीला देखील एक हेलिकॉप्टर क्रॅश झालं होतं. या दुर्घटनांमुळे स्थानिक प्रशासन, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी तातडीने पोहोचले आहे. ही अतिशय दु:खद घटना आहे.