Kerala Sea Surge Big Natural Disaster in 2050 : 2050 वर्ष हे भारतासाठी धोकादायक ठरणार आहे. 2050 मध्ये भारतातील अनेक शहरं समुद्रात बुडणार असल्याची भिती संशोधकांनी व्यक्त केली आहे. क्लायमेट सेंट्रल या अमेरिकन संस्थेने 2019 मध्ये क्लायमेट चेंजबाबत मोठा दावा केला होता. या दाव्यानंतर ज्याची भिती आहे तेच घडतयं. भारतातील एक ठिकाण डेंजरझोनमध्ये आले आहे. हे शहर हळू हळू समुद्रात बुडत आहे. जाणून घेऊया हे शहर कोणते आहे.
केरळमधील किनाऱ्यावरचा परिसर हळू हळू समुद्र गिळंकृत करत आहे. केरळच्या समुद्र किनाऱ्यावरील अरियड, अझिकोडे, चेल्लनम, अंबालापुझा, पुरक्कड, कुझुप्पिल्ली आणि वडनापिल्ली हे परिसर धोकादायक स्थितीत आहेत. केरळला 590 किमी लांबीची समुद्र किनारा लाभलेला आहे. त्यापैकी 55 टक्के समुद्र किनाऱ्याची धूप झाली आहे. इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन सर्व्हिसेस (INCOIS) नुसार केरळच्या 300 किमी किनारपट्टीला धूपचा फटका बसला आहे. कन्नूर, कोची, अलप्पुझा आणि कासारगोड सारख्या भागात दरवर्षी 6 मीटर अंतरावर समुद्राची धूप होत आहे.
तिरुअनंतपुरम, कोल्लम, मलप्पुरम आणि त्रिशूरच्या काही भागांमधील समुद्रकिनारे आधीच नाहीसे झाले आहेत. तर अनेक समुद्र नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. अरबी समुद्रातील तापमानवाढीमुळे चक्रीवादळाच्या घटनांचे प्रमाण वाढले आहे. समुद्रात मोठ्या लाटा उसळतात. समुद्र किनाऱ्यावर आलेल्या वादळांमुळे हजारो घरे समुद्रात बुडाली आहेत. केरळ युनिव्हर्सिटी ऑफ फिशरीज अँड ओशन स्टडीज (KUFOS) ने समुद्र किनारे धोकादायक स्थितीत असल्याचे सांगितले. फक्त बदलते हवामानच नाही तर मानवनिर्मितीत समस्या देखील याला जबाबदार आहेत. मोठ्या प्रमाणात वाळू उत्खनन केले जात आहे. समुद्र किनाऱ्यांलगत मोठ्या प्रमाणात बांधकाम करण्यात आले आहे.
मुंबई आणि कोलकातासह भारतातील आणखी काही शहरांना समुद्रामुळे मोठा धोका निर्माण होणार आहे. सुरत, ओडिशा, केरळ, तामिळनाडू या शहरांचा धोकादायक यादीत समावेश आहे. 2050 पर्यंत समुद्र पातळीत प्रचंड प्रमाणात वाढ होणार आहे. समुद्र किनाऱ्यावर वसलेल्या 10 देशांच्या लोकसंख्येवर याचा प्रभाव होणार आहे. सर्वाधिक प्रभावित देशांच्या यादीत भारत अव्वल स्थानी आहे.
वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात. यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.
...Read More|
IND-A
(20 ov) 197/8
|
VS |
NAM
67(12.1 ov)
|
| India A beat Namibia by 130 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
ITA
(20 ov) 193/7
|
VS |
UAE
81(18.2 ov)
|
| Italy beat United Arab Emirates by 112 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
(20 ov) 208/7
|
VS |
USA
201/8(20 ov)
|
| New Zealand beat USA by 7 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.