मुंबई : काही लोक धोकादायक प्राण्यांशी खेळण्यापासून मागे हटत नाहीत. मग तो विषारी साप असोत किंवा आणखी कोणी. आपल्याला सोशल मीडियावर यासंदर्भात अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात. हे व्हिडीओ कधी खूपच सुंदर असतात. तर कधी हे व्हिडीओ धोकादायक देखील असतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. जो पाहून लोकांना तुमच्या अंगावर देखील काटा उभा राहिल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर नुकताच एका सापाचा व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती आपल्या हातात लांब किंग कोब्रा उचलून धरत आहे. मात्र बघता-बघता साप त्याच्यावर हल्ला करतो. तो इतक्या वेगाने हल्ला करतो की, तुम्हाला वाटेल की, हा व्यक्ती आता गेलाच...


परंतु या किंग कोब्राला हाताळणारा व्यक्ती तितकाच वेगवान असतो. त्याला सापाची ही चलाखी लक्षात येणे आणि तो लगेचच कोब्राचा नेम चुकवतो. हे दृश्य खूपच भीतीदायक आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.


या व्हिडीओमध्ये तुम्हाला एक व्यक्ती मोकळ्या मैदानात उभी असल्याचे दिसेल. त्याच वेळी, तो त्याच्या हातात एक लांब आणि धोकादायक किंग कोब्रा उचलतो. सुरुवातीला साप खूप शांत असतो, पण काही वेळाने तो त्या व्यक्तीवर हल्ला करतो. तुम्ही फक्त विचार करा की, या व्यक्तीने क्षणाचा जरी विलंब केला असता, तर त्याच्यासोबत काय घडलं असतं, याचा आपण विचार देखील करु शकत नाही.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


वन्यजीवांशी संबंधित हा व्हिडीओ animals_powers नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर अपलोड करण्यात आला आहे. व्हिडीओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज तसेच हजारो लाईक्स आले आहेत.