Ladakh Development Projects: दरवर्षी लाखोच्या संख्येनं पर्यटक हे उत्तर भारतात जातात. त्यापैकी एक ठिकाण आहे लडाख. अनेक लोकं लडाखला जाण्याचा विचार करतात. आता लडाखला जायचं असेल तर आपण फक्त गाडीनं प्रवास करूनच जाऊ शकतो किंवा विमानानं प्रवास केल्यानंतर मग पुन्हा बाईक घेऊन आपल्याला संपूर्ण प्रवास करावा लागतो. लडाखला जाणं हे सगळ्यात खर्चिक असतं म्हणून लोकं काही प्रवास ट्रेननं आणि मग गाडीनं असं करण्याचा विचार करतात. पण आता हा खर्चिक प्रवास होणार नसल्याचं संकेत मिळत आहेत. ज्यूनियन यूनियन हायवे मिनिस्टर हर्ष मल्होत्रा यांनी रविवारी 23 मार्च 2025 ला सांगितलं की केंद्र शासित राज्य असलेल्या लडाखमध्ये 2019 मध्ये आर्टिकल 370 हटवल्यानंतर, नागरी आणि लष्करी सुविधांसाठी रस्ते जोडणीशी संबंधित अनेक प्रकल्प सुरु झाले आहेत. त्याविषयी सांगताना ते म्हणाले 2020 पासून विविध क्षेत्रातील अनेक मोठे प्रकल्प या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे.
हर्ष मल्होत्रा यांनी सांगितलं की 'सध्याच्या रस्ते वाहतुकीविषयी बोलायचं झालं तर दिल्ली ते लेकपर्यंत असा 40 तासांचा प्रवास करावा लागतो. पण आता रेल्वे लाइनची तयारी सुरु आहे, त्यामुळे आता हा काळ 20 तासांपर्यंत पोहोचणार आहे.' याविषयी सविस्तर बोलताना ते म्हणाले की श्रीनगर-लेर रेल्वे प्रोजेक्ट रद्द करण्यात आलेला नाही. तर त्याला फक्त काही काळासाठी थांबवण्यात आलं आहे. तर त्यांनी यावेळी 1.31 लाख कोटींच्या बिलासपुर-मनाली-लेह रेल्वे प्रोजेक्टचा देखील यावेळी विषय काढला. त्यानंतर लेह विमानतळावर 640 कोटींच्या नव्या टर्मिनल प्रोजेक्टविषयी देखील त्यांनी माहिती दिली.
दरम्यान, नीमू-पदाम-दारचा रोड हा 2 वर्षांच्या आत तयार होईल. तो हिमाचल प्रदेश आणि लडाखला जोडणार आहे. या लडाखमध्ये प्रत्येक वातावरणात कनेक्टिविटी असणार आहे. जी सर्वसामान्यपणे आणि मिलिट्रीची आवश्यकतेला पूर्ण करण्यासाठी सक्षण होईल. याबाबत हर्ष मल्होत्रा म्हणाले की, नीमू-पदाम-दार्चा रोडवरील 2405 कोटी रुपयांच्या प्रकल्पाला प्राधान्य आहे. यामुळे लडाखची कनेक्टिव्हिटी आणखी मजबूत होईल.