Ladki Bahin: ई-केवायसी करुनही पैसे मिळेना; 'लाडक्या बहिणीं'चा हफ्ता आचारसंहितेच्या कचाट्यात?

Ladki Bahin: लाडकी बहिणीचा हप्ता रखडल्यामुळे राज्यातीव महिला आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय.

प्रविण दाभोळकर | Updated: Jan 23, 2026, 10:31 PM IST
Ladki Bahin: ई-केवायसी करुनही पैसे मिळेना; 'लाडक्या बहिणीं'चा हफ्ता आचारसंहितेच्या कचाट्यात?
लाडकी बहीण

Ladki Bahin: लाडकी बहिण योजनेचा हप्ता रखडल्यामुळे राज्यभरातील महिलांनी संताप व्यक्त केलाय. वाशिममध्ये तर महिलांनी सलग तिसऱ्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिलीय. ई-केवायसी करूनही हप्ता न मिळाल्याने लाडक्या बहिणी सरकारवर संतापल्याचं पाहायला मिळतंय. तर मंत्री मात्र लवकरच लाडक्या बहिणींचा हप्ता मिळेल असं म्हणत वेळ मारून नेतायत. 

Add Zee News as a Preferred Source

लाडक्या बहिणीचा हप्ता रखडल्यामुळे राज्यातीव महिला आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. ई-केवायसी करूनही लाडकी बहिणचा हफ्ता मिळाला नसल्यामुळे महिलांनी सरकारविरोधीत संताप व्यक्त केलाय.. रखडलेल्या हप्तासाठी वाशिममध्ये सलग तिसऱ्या दिवशी लाडक्या बहिणींनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत आंदोलन केलंय.. तर नोव्हेंबरच्या रखडलेल्या हप्त्यासाठी अमरावतीमध्येही लाडक्या बहिणींनी आदोलन करत संताप व्यक्त केला होता.तर यवतमाळमध्येही हप्ता रखडल्याने लाडक्या बहिणी भडकल्याचं पाहायला मिळालं. लाडक्या बहिणींना नियमित हप्ता मिळत नाही. मग आमच्या हक्काचे पैसे गेले तरी कुठे असा सवाल लाडक्या बहिणींनी केलाय.. तर मतदानापुरत्याच बहिणी लाडक्या होत्या का ? असा सवाल करत लाडक्या बहिणींनी सरकारला अनेक सवाल केलेत. 

लाडक्या बहिणींच्या रखडलेल्या हप्त्यावरून काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय.. केवळ निवडणुकीपुरतीच ही योजना चालु केली होती का ? असा सवाल करत सतेज पाटील यांनी सरकारवर निशाणा साधलाय.

तर महिलांच्या सक्षमीकरणासाठी लाडकी बहिण ही योजना सुरू केलीय. काही तांत्रिक कारणांमुळे हप्ता रखडला होता. लाडक्या बहिणींचे हप्ते लवकरात लवकर सुरळीत सुरू होतील असं मंत्री पंकज भोयर यांनी म्हटलंय. 

e-KYC करताना महिलांनी चुकीचा पर्याय निवडल्याचं समोर आलं. त्यामुळे योजनेच्या निकषांनुसार लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेत. मात्र असं असलं तरी हप्ता रखडल्यामुळे राज्यभरातील लाडक्या बहिणींनी सरकारविरेधात संताप व्यक्त केल्याचं पाहायला मिळतंय. तर विरोधकांनीही सरकारचा समाचार घेतलाय. त्यामुळे आता तरी लाडक्या बहिणींचा रखडलेला हप्ता मिळणार की झेडपी आणि पंचायत समितीचीच्या आचारसंहितेच्या कचाट्यात अडकणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

About the Author

Pravin Dabholkar

"प्रवीण सुरेश दाभोळकर हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये चीफ सब एडीटर पदावर कार्यरत आहेत त्यांना मीडिया क्षेत्राचा 14 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल मीडियासह विविध माध्यमांमध्ये काम केले आहे. संशोधनात्मक अहवाल आणि फिचर रायटिंगकडे त्यांचा कल आहे. वाचकांना माहिती नसलेल्या कथा लोकांसमोर आणण्याची त्यांना आवड आहे. हे करीत असताना सविस्तर तपशील आणि अचूकतेकडे त्यांची कटाक्षाने नजर असते. फावल्या वेळात प्रविण आपल्या आनंदासाठी फिरणे, नवीन गोष्टी आत्मसात करणे आणि सामाजिक कार्यात गुंतलेले असतात. त्यांचे लेखन अनेकदा सामाजिक न्यायाच्या समस्यांबद्दलची त्यांची उत्कटता दर्शवते. तसेच आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात."

...Read More