Rise and Fall of Lalit Modi: सध्या भारतात इंडियन प्रिमीयर लीग अर्थात IPL ची धुम सुरु आहे. IPL चा यंदा हा 18 वा सिजन आहे. IPL सोबत चर्तेत आला आहे तो भारतात IPL सुरु करणारा व्यक्ती. भारतात IPL सुरु करणारा फरार सध्या फरार आहे. त्याच्या बँक खात्यात 45550000000 एवढा बॅलेन्स आहे. आईच्या मैत्रिणीशी लग्न, वयाच्या 61 व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्रीसह अफेयर आणि बरचं काही... जाणून घेऊया नेहमी चर्चेत असणारा हा व्यक्ती आहे तरी कोण?
भारतात IPL सुरु झाले की ललित मोदीचे नाव चर्चेत येते. ललित मोदीनेच भारतात IPL सुरु केले. 2008 मध्ये भारतात पहिल्यांदाच इंडियन प्रीमियर लीग सुरू करणारा ललित मोदी भारतातून फरार आहे. आयपीएलचे माजी अध्यक्ष आणि फरार ललित मोदी याने अलीकडेच भारतीय नागरिकत्व सोडण्यासाठी अर्ज केला. त्याला वानुआटु या देशाचे नागरिकत्व पाहिजे होते. पण तो मिळू शकले नाही.कोट्यावधीचं साम्राज्य उभ करणाऱ्या ललित मोदीची आता काय अवस्था झालेय. मोठा गैरव्यवहार केल्यानंतर मे 2010मध्ये ललित मोदीने भारतातून युकेला पलायन केले.
IPL ही भारतातील सर्वात प्रतिष्ठीत क्रिकेट लीग आहे. संपूर्ण जगाचे लक्ष IPL वर असते. 2008 मध्ये आयपीएलचा पहिला हंगाम खेळला गेला. ललित मोदी यांनी त्यांच्या संपर्कांचा वापर करून बॉलिवूडमधील बड्या सेलिब्रिटींना आणि उद्योगपतींना आयपीएल संघ खरेदी करण्यास भाग पाडले. हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन, राजस्थान क्रिकेट असोसिएशन आणि पंजाब क्रिकेट असोसिएशनमध्ये काम करणाऱ्या ललित मोदींनी आता बीसीसीआयमध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. 2008 ते 2010 पर्यंत ललित मोदी आयपीएलचे अध्यक्ष होते.
क्रिकेट प्रेमी ललित मोदी हे मोदी एंटरप्रायझेसचे अध्यक्ष आहेत. भारत सोडल्यानंतरही त्यांनी मोदी एंटरप्रायझेसची जबाबदारी सांभाळली. मोदी यांची 1200 कोटी रुपयांची कंपनी कृषी, तंबाखू, पान मसाला, माउथ फ्रेशनर, कन्फेक्शनरी, रिटेल, शिक्षण, कॉस्मेटिक, मनोरंजन आणि रेस्टॉरंटमध्ये व्यवसाय करते. एका वृत्तानुसार जुलै 2022 मध्ये ललित मोदींची एकूण संपत्ती 4,555 कोटी रुपये होती. मध्य पूर्व, पश्चिम आफ्रिका, आग्नेय आफ्रिका, आग्नेय आशिया, पूर्व युरोप, ऑस्ट्रेलिया, दक्षिण अमेरिका आणि मध्य अमेरिकेसह जगातील अनेक देशांच्या ललित मोदीच्या कंपनीचा कारभार परसलेला आहे.
ललित मोदींची एकूण 4.555 कोटी इतकी आहे. आलिशान बंगले आणि फ्लॅट्सचे मालक असलेल्या ललित मोदीकडे 15 कोटी रुपयांच्या तीन फेरारी कार आहेत. याशिवाय मोदींकडे एक खाजगी विमान देखील आहे.
ललित मोदीचे खाजगी आयुष्य देखील तितकेच चर्चेत राहिले. ललित मोदीने आईच्या मैत्रीणीशी लग्न केले. जी त्याच्यापेक्षा 9 वर्ष मोठी होती. तर, वयाच्या 61 व्या ललित मोदी याने बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनसोबत लग्नाची घोषणा केली. दोघांचे फोटोही व्हयारल झाले होते. मात्र, फक्त मैत्री असल्याचे सांगण्यात आले.