मुंबई : जगातली सर्वात मोठी सिमेंट कंपनी Holcim Group ने भारतातून आपला १७ वर्ष जुना कारभाराचा गाशा गुंडाळण्याची तयारी सुरु केली आहे. कंपनीने कोर मार्केटवर फोकस करण्यासाठी ग्लोबल स्ट्रेटजी तयार केली आहे. भारतीय बाजारातून एक्झिट घेणे ही व्यापक रणनीतीचा भाग असल्याचं सांगण्यात येत आहे. या प्रकरणाशी संबंधित सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आपल्या २ लिस्टेड कंपन्या अंबुजा सिमेंट आणि एसीसी सिमेंट लिमिटेड विक्रीसाठी ठेवली आहे.
Holcim Group आपला भारतीय कारभार विकण्यासाठी जेएसडब्लू आणि अदानी ग्रुप सह इतर कंपन्यांशी चर्चा करीत आहे, जेएसडब्लू आणि अदानी ग्रुपने काही दिवसापूर्वीच सिमेंट कारभारात पाय ठेवला आहे.
Holcim आपला भारतीय बिझनेस विकण्यासाठी जेएसडब्लू आणि अदानी ग्रुपसह इतर सिमेंट कंपन्या आणि अदानी ग्रुपशी बातचित करत आहे. जेएसडब्लू आणि अदानी ग्रुपने काही महिन्यांपूर्वीच सिमेंट बिझनेसमध्ये पदार्पण केलं आहे.
विशेष म्हणजे दोन्ही समूहांकडे सिमेंट कारभार वाढवण्यासाठी आक्रमक योजना आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार, श्री सिमेंटसारख्या स्थानिक कंपन्यांशीही कंपनी विकत घेण्यासाठी संपर्क केला गेला आहे.
भारतीय सिमेंट बाजारात आदित्य बिर्ला ग्रुपची अल्ट्राटेक सिमेंट कंपनी सर्वात मोठी कंपनी आहे. अल्ट्राटेकजवळ दरवर्षी ११७ मिलियन टन सिमेंटचं उत्पादन करण्याची क्षमता आहे. Holcim ग्रुपच्या दोन्ही लिस्टेड कंपन्या अंबुजा सिमेंट आणि एसीसी सिमेंट यांची संयुक्त वार्षिक क्षमता ६६ मिलियन टन आहे.
जो कोणता समूह या दोन्ही सिमेंट कंपन्यांना विकत घेईल, तो समूह एका झटक्यात भारतातील नंबर २ चा सिमेंट कंपनीचा समूह होईल. यासाठी अशा ग्लोबल सिमेंट कंपन्यांचा देखील कल घेतला जात आहे, जे भारतात सिमेंट बाजारात येण्यास उत्सुक आहेत.