Madhya Pradesh Geological Survey News: 2026 मध्ये भारताला मोठा जॅकपॉट लागणार आहे. भारतातील या राज्यात हिरे, सोनं, चांदी अशा सर्व मौल्यवान धातूंच्या खाणी एकदमच सापडल्या आहेत. 2026 मध्ये भरात सरकार येथे उत्खनन करणार आहे. हा खजिना भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी मोठा बुस्टर ठरणार आहे. जाणून घेऊया भारतातील कोणत्या राज्यात ही मौल्यवान धातूची खाण सापडली आहे.
भारतातील मध्य प्रदेश या राज्यात मौल्यवान धातुच्या खाणी आहेत. मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यात हिरे, सोने आणि चांदीचे मोठे साठे सापडण्याची शक्यता आहे. भारतीय भूगर्भ सर्वेक्षण संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात हे उघड झाले आहे. या जिल्ह्यात मौल्यवान धातुंचा धोश शिवपुरीसाठीच नव्हे तर संपूर्ण राज्याच्या अर्थव्यवस्थेसाठी एक मोठी उपलब्धी ठरणार आहे.
शिवपुरी जिल्ह्यातील नरवार आणि खानियाधाना तहसीलमध्ये मौल्यवान खनिज संपत्तीचे साठे असल्याचे सर्वेक्षणात उघडकीस आले आहे. येथील 630 चौरस किलोमीटर क्षेत्रावर सर्वेक्षण करण्यात आले. यात 60 हून अधिक गावांचा सामवेश आहे. या परिसराच उत्खननाच्या शक्यतांचा तज्ञांकडून सखोल अभ्यास केला जात आहे.
भारत सरकारच्या खनिज विभागाच्या मते 2026 पासून या भागात उत्खननाचे काम सुरू होण्याची शक्यता आहे. उत्खननासाठी आवश्यक कायदेशीर आणि तांत्रिक प्रक्रिया आधीच सुरू झाल्या आहेत. 2026 मध्ये उत्खनन सुरु झाल्यास शिवपुरीचे आर्थिक चित्र पूर्णपणे बदलू शकते. तसेच येथे रोजगाराच्या नवीन संधी देखील निर्माण होतील.
येथे सापडलेल्या मौल्यवान धातुच्या खाणी या मध्य प्रदेशला नवीन उंचीवर नेऊ शकतात. भारतीय भूगर्भ सर्वेक्षण संस्थेने केलेल्या सर्वेक्षणाची सरकार आणि प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली आहे. जर उत्खननात येथे हिरे, सोने आणि चांदी असे मौल्यवान धातू सापडले तर शिवपुरी औद्योगिक आणि खाण क्षेत्र म्हणून विकसित होऊ शकते. यामुळे जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. राज्य आणि देशाच्या महसुलातही वाढ होईल. यामुळे 2026 मध्ये होणाऱ्या या उत्खननाकेड सर्वांचेच लक्ष लागले आहे.
वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात. यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.
...Read More
LIVE|
IRE
182/6(20 ov)
|
VS |
AUS
115(16.5 ov)
|
| Full Scorecard → | ||
|
SA
(20 ov) 187/6
|
VS |
AFG
187(19.4 ov)
|
| Afghanistan tied with South Africa (South Africa won the 2nd Super Over by 4 runs) | ||
| Full Scorecard → | ||
|
PAK
(20 ov) 190/9
|
VS |
USA
158/8(20 ov)
|
| Pakistan beat USA by 32 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
BRN
(20 ov) 113/7
|
VS |
QAT
115/3(16.4 ov)
|
| Qatar beat Bahrain by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.