Madhya Pradesh Rewa Suicide Case: अभियंता अतुल सुभाष आणि नंतर मानव शर्मा यांच्यासारख्या घटनेसारखीच घटना मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यातून समोर आली आहे. रीवामध्ये एका व्यक्तीने इंस्टाग्राम लाईव्ह येऊन सत्य सांगत आत्महत्या केली. आश्चर्याची बाब म्हणजे त्याची पत्नी आणि सासूही हे लाईव्ह पाहत होती. पंरतु त्या दोघांनीही त्याला वाचवण्यासच प्रयत्न केला नाही. इंस्टाग्रामवर लाइव्ह जात शिवप्रकाश त्रिपाठी नावाच्या व्यक्तीने त्याच्या आत्महत्येसाठी पत्नी आणि सासूला जबाबदार (domestic dispute) धरले. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही महिलांना अटक केली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
या घटनेची माहिती देताना पोलीस उपविभागीय अधिकारी उमेश प्रजापती यांनी सांगितले की, " शिवप्रकाश त्रिपाठी या व्यक्तीने १६ मार्च रोजी हे टोकाचे पाऊल उचलले. ही घटना घडत असतांना त्यांच्या पत्नीनेही पाहिले होते." पोलिसांनी पुढे सांगितले की, " या व्यक्तीने दोन वर्षांपूर्वी प्रिया शर्मा नावाच्या महिलेशी लग्न केले होते. काही वेळाने त्याला समजले की त्याची पत्नी दुसऱ्या पुरुषासोबत रिलेशनशिपमध्ये आहे."
हे ही वाचा: Meerut Murder: मुलीला फाशीची मागणी करणाऱ्या आईचे भिंग फुटलं, जावईच्या सहानुभूतीचे कारण झाले उघड!
शिवप्रकाश त्रिपाठीला त्याच्या पत्नीबद्दल माहिती असूनही त्यांने काहीही कोणालाही सांगितले नाही, असे बोलले जात आहे. त्याने आपले लग्न आणि नाते जपले अशीही चर्चा होत आहे. दरम्यान, एका अपघातात तो गंभीर जखमी झाला, त्यानंतर त्याची पत्नी त्याला सोडून तिच्या पालकांसोबत राह्यला माहेरी निघून गेली.
लाइव्हमध्ये येताना त्या व्यक्तीने सांगितले की, सासू-सासरे आणि पत्नीमुळे तो आपल्या जीव देत आहे. या लग्नामुळे त्याचा आनंद उध्वस्त झाला, असाही त्याने दावा केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी त्या व्यक्तीची पत्नी आणि सासू यांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
हे ही वाचा: 'पुरुषांचाही विचार करा' म्हणत TCS च्या मॅनेजरची आत्महत्या! बायकोच्या 'त्या' हट्टाने घेतला जीव
जर तुम्हालाही कोणत्याही प्रकारच्या मानसिक समस्येने ग्रासले असाल किंवा अशा समस्येने ग्रस्त असलेल्या एखाद्या व्यक्तीला तुम्ही ओळखत असाल, तर त्यांची मदत करा. यासाठी आम्ही सरकारच्या हेल्पलाइनचे नंबर देत आहोत. यावरून मानसिक आरोग्य तज्ज्ञांशी संपर्क साधता येतो.