एकट्यात पॉर्न पाहते पत्नी, हस्तमैथुनची सवय; हायकोर्टानं फेटाळली नवऱ्याची घटस्फोटाची याचिका

Court Rejects Husbands Plea of Divorce : पत्नी एकट्यात पॉर्न पाहते आणि हस्तमैथुन करते कारण सांगत नवऱ्यानं केली होती घटस्फोटाची याचिका; फेटाळात हायकोर्टानं सांगितलं...

दिक्षा पाटील | Updated: Mar 20, 2025, 10:39 AM IST
एकट्यात पॉर्न पाहते पत्नी, हस्तमैथुनची सवय; हायकोर्टानं फेटाळली नवऱ्याची घटस्फोटाची याचिका
(Photo Credit : Social Media)

Court Rejects Husbands Plea of Divorce : अनेकदा महिला पॉर्न पाहतात किंवा हस्तमैथुन करतात यावरून चर्चा होते. अनेकदा त्यांच्या नवऱ्याला ही गोष्ट पटत नाही किंवा हे नवऱ्यासोबत चांगले संबंध किंवा त्याच्याविषयी क्रुर वृत्ती असं म्हणतात. दरम्यान, आता कौटुंबिक न्यायालयानं या आधारावर एका व्यक्तीला घटस्फोट देण्यास नकार दिला आहे. न्यायमूर्ती जी आर स्वामीनाथन आणि न्यायमूर्ती पोर्णिमाच्या खंडपीठानं बुधवारी म्हटलं की पुरुषांमध्ये हस्तमैथुन करणे हे सर्वसामान्य मानले जाते तर महिलांनी केलेले हस्तमैथुनला चुकीचं का मानलं जातं. पुरुष हस्तमैथुन केल्यानंतर लगेच लैंगिक संबंध ठेवू शकत नाहीत, परंतु महिलांच्या बाबतीत असे होणार नाही. पत्नीला हस्तमैथुन करण्याची सवय असल्यास पती-पत्नीमधील वैवाहिक संबंधांवर परिणाम होईल हे देखील कोणत्याही पद्धतीनं सिद्ध झालेलं नाही.

या प्रकरणाची सुनावणी करताना न्यायाधीशांनी सांगितलं की 'जर एखाद्या महिलेचे लग्नानंतर विवाहबाह्य संबंध असतील तर ते घटस्फोटाचे कारण ठरू शकते. पण स्वयंम सुखात मग्न होण हे वैवाहिक वादासाठी कारणीभूत ठरता कामा नये. त्यामुळे कोणत्याही प्रकारे असं म्हणू शकत नाही की ती असं काही करून पतीवर क्रुरता करते. पत्नीनं एकांतात पॉर्न पाहणं हे घटस्फोटाची मागणी करणाऱ्या नवऱ्याविषयी क्रूरता असल्याचं म्हणता येणार नाही. हे पाहणाऱ्या नवरा किंवा बायकोच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करु शकते.'

कोर्टानं पुढे सांगितलं की 'जर जी व्यक्ती पॉर्न पाहणारी व्यक्ती दुसऱ्याला अर्थात नवऱ्याला किंवा बायकोला ते पाहण्यासाठी जबरदस्ती करत असेल तर ही नक्कीच क्रूरता किंवा चुकीचं आहे. जर हे सिद्ध करता आलं की याचं व्यसन आहे आणि त्यामुळे एखाद्याच्या वैवाहिक जबाबदाऱ्या पार पाडण्यावर काही वेगळाच परिणाम होत आहे, तर त्यावर काही कारवाई घेता येऊ शकते.'

ज्यानं ही तक्रार केली आहे त्या दोघांचं लग्न 2018 मध्ये हिंदू परंपरेनुसार एका मंदिरात करण्यात आली. हे त्या दोघांचं दुसरं लग्न होतं आणि त्यांना बाळ झालं नाही. ते डिसेंबर 2020 मध्ये विभक्त झाले. पत्नीनं तिला तिचे वैवाहिक हक्क परत मिळावे यासाठी न्यायलयात अर्ज दाखल केला होता तर तिच्या नवऱ्यानं थेट घटस्फोटाची मागणी केली. गेल्या वर्षी फेब्रुवारी 2024 मध्ये कौटुंबिक न्यायालयानं त्या पुरुषाची याचिका फेटाळली होती. तर त्यानं कोर्टाच्या या आदेशाला आव्हान देत 2024 मध्ये पुन्हा एकदा अपील दाखल केली.

हेही वाचा : काळ्या जादूच्या नादात पतीची हत्या? मेरठ हत्याकांड प्रकरणाला वेगळं वळण? पत्नी म्हणाली, 'मी हत्या नाही वध...'

यावेळी त्या पुरुषानं कारण सांगितलं की ती खूप खर्च करते. तिला पॉर्न पाहण्याची सवय आहे. नेहमीच हस्तमैथुन करते. घरातली काम करण्यास नकार देते. सासरच्या लोकांना चुकीची वागणूक देते. फोनवर खूप वेळ बोलत राहते. नवऱ्यानं केलेल्या या सगळ्या आरोपांवर तिनं नकार देत ती म्हणाली की जर असं असतं तर ती दोन वर्षांपासून एकत्र राहिली नाहीती. न्यायालयानं सांगितलं की तिचा नवरा दुसरे आरोप साध्य करू शकत नाही आहे.