Mahakumbh 2025 Blue Eyes Dusky Skin Garland Seller Girl Goes Viral: 144 वर्षांनंतर प्रयागराज शहरात महाकुंभ मेळा 2025 होत आहे. भव्य कार्यक्रम विविध विधी, परंपरा, आणि चालीरीतीसह हा कुंभमेळा सुरु आहे. प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभात आपला माल विकण्यासाठी दूरदूरवरून लोक येत आहेत. वेगेवगेळ्या विक्री करणाऱ्या विक्रेत्यांसाठी ही मोठी संधी आहे. या मेळ्यातील अनेक व्हिडीओ, फोटो रोज सोशल मीडियावर येत आहेत. अनेक लोक यामुळे व्हायरल झाले आहेत. अशीच एक इंदूरमधील मोनालिसा नावाची १६ वर्षीय तरुणीही महाकुंभ मेळ्यात माळा विकण्यासाठी आली आहे. या माळा विकणाऱ्या मुलीच्या सौंदर्याची सगळीकडेच चर्चा आहे. त्यामुळे तिच्यावर अनेक रिल्स बनवले जात आहेत. या रीलवरही यूजर्स खूप प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
काजळ घातलेले सुंदर डोळे आणि डस्की त्वचा असलेल्या मुलीचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. एका व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे, परंतु हा व्हिडीओ चुकीच्या कारणास्तव व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की त्या मुलीचे सौंदर्य टिपण्यासाठी इंस्टाग्राम रील्ससाठी कॅप्चर करण्यासाठी पुरुष युट्युबर कॅमेरासह रांगेत उभे आहेत. ती निघत जात आहे तरी तेव्हा फोन आणि कॅमेरे घेऊन उभे असलेले तरुण तिच्या मागे जात आहेत. यामुळे नेटकरी ही तिची स्तुती आहे की हा तिचा छळ आहे? असा प्रश्न करत आहेत.
हे ही वाचा: Photo: 22 बायका, 100 मुलं... जगाला सर्वात श्रीमंत देश देणारा राजा कोण होता?
मोनालिसाचे अनेक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत. ज्यामध्ये ती तिचे नाव आणि पत्ता सांगण्यासोबतच तिला विचारलेल्या लग्नाच्या प्रश्नांची उत्तरेही देताना दिसत आहे. या कथेमध्ये तुम्हाला माळा विकणाऱ्या मुलीची संपूर्ण माहिती मिळेल.
हे ही वाचा: Hindu Ritual: महिलांनी नारळ का फोडू नये? याचे कारण जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल
शिवम लखारा या इंस्टाग्राम हँडलवर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये एक माणूस माळा विकणाऱ्या मुलीशी बोलताना दिसत आहे. तो तिला म्हणती की, तुमच्या सुंदर डोळ्यांमुळेच लोक तुमचे फोटो काढतात. ज्याच्या उत्तरात ती म्हणते की ती आता व्हायरल झाली आहे. हातात माळा घेऊन जत्रा परिसरात व्यवसाय करणाऱ्या या मुलीसोबत फोटो काढण्यासाठी लोक मागे उभे असलेलेही दिसतात.
हे ही वाचा: Maha Kumbh 2025: नागा साधूंना थंडी का लागत नाही? जाणून घ्या मनोरंजक उत्तर
शिवम लखाराने इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या आणखी एका व्हिडीओमध्ये तो मुलीला प्रश्न विचारताना दिसत आहे. प्रथम तो तिच्याशी मोनालिसाला तिच्या माळा विक्रीच्या व्यवसायाबद्दल विचारतो. मग पुढे तो तिला विचारतो की लग्न? तर ती म्हणते की मी लहान आहे, फक्त 16 वर्षांची आहे. ज्यानंतर तो विचारतो की तिला कोणाला आवडले आहे का, इतके युटूबर्स तुला फॉलो करत आहेत त्यापैकी?
हे ही वाचा: Maha Kumbh 2025: कोण असतात 'तंगटोडा साधू'? ज्याची मुलाखत IAS पेक्षाही असते अवघड, जाणून घ्या प्रोसेस
या प्रश्नाच्या उत्तरात मुलगी म्हणते, "नाही, कोणी नाही. प्रत्येकजण माझ्या भावासारखा आहे. आमच्यामध्ये जेवढ्या माळा विकणाऱ्या मुली आहेत ना त्या आपल्या पालकांच्या इच्छेनुसारच लग्न करतात." ही ७४ सेकंदाची क्लिप या संभाषणाने संपते.
तेजश्री गायकवाड- कदम 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. लोकसत्तामधून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. लोकसत्ताच्या Viva पुरवणीमधून 7 वर्ष विविध विषयांवर लिखाण केले आहे. दैनिक भास्करच्या 'मधुरिमा' मधून फॅशन विषयांवर लिखाण केले आहे. 'झी 24 तास'च्या आधी त्यांनी नवशक्ती (फ्री प्रेस जर्नल), हिंदुस्थान टाइम्स मराठी डिजिटल, लोकसत्ता ऑनलाईन या वृत्तसंस्थेत लिखित बातम्या आणि व्हिडीओ अशा दोन्ही फॉरमॅटमध्ये काम केले आहे. 2018 ते 2023 पर्यंत मुंबई आकाशवाणीमध्ये व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आणि कॉन्टेन्ट रायटर म्हणून काम केले आहे. फॅशन, लाइफस्टाईल, मनोरंजन आणि स्पोर्ट्स या विविध विषयांमध्ये रुची आहे.
...Read More
LIVE|
WI
(10 ov) 32/2 (75 ov) 205
|
VS |
NZ
278/9(74.4 ov)
|
| Full Scorecard → | ||
LIVE|
PHI
40/1(5 ov)
|
VS |
INA
|
| Full Scorecard → | ||
|
SIN
(20 ov) 156/8
|
VS |
THA
152/9(20 ov)
|
| Singapore beat Thailand by 4 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
PHI
(20 ov) 145/9
|
VS |
SIN
131/6(20 ov)
|
| Philippines beat Singapore by 14 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
INA
(20 ov) 75/9
|
VS |
MAS
78/3(9 ov)
|
| Malaysia beat Indonesia by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.