Maharaja Bhupinder Singh: एकेकाळी भारतातही राजेशाही होती. भारतात अनेक राजे, महाराजे आणि सम्राट होऊन गेले. प्रत्येकाचा स्वतःचा इतिहास आहे. या राजे आणि सम्राटांना अनेक राजेशाही छंद होते. असाच एक राजा होता ज्याच्या तब्बल 365 राण्या होत्या. या राजाच्या महलात फक्त विवस्त्र होऊनच एंट्री मिळायची मिळायची जाणून घेऊया हा राजा कोणता?
या राजाचे नाव आहे भूपिंदर सिंग. भारतातील सर्वात अय्याश राजा अशी महाराजा भूपिंदर सिंग यांची ओळख. भूपिंदर सिंग हे 1900 ते 1938 पर्यंत ब्रिटीश भारतातील पटियाला संस्थानाचे राज्य करणारे महाराजा होते. या राजाची उंची 6 फूट 4 इंच तर वजन 178 किलो होते.
दिवाण जरमनी दास यांच्या 'महाराजा' या पुस्तकात भूपिंदर सिंग यांच्याबद्दलच्या अनेक रंजक गोष्टींचा तपशीलवार उल्लेख करण्यात आला आहे. खाजगी जेट खरेदी करणारे ते पहिले भारतीय व्यक्ती होते. महाराजा भूपिंदर सिंग यांनी त्यांच्या पटियाला राजवाड्यात लीला-भवन बांधले होते. हा लीला भवन म्हणजे अय्याशीचा राजवाडा होता असेही म्हणतात. जरमणी दास यांनी आपल्या पुस्तकात या लीला भवन बाबत अतिशय रंजक किस्सा लिहीला आहे. या महालात कपडे घालून कोणालाही प्रवेश दिला जात नव्हता. कपडे काढल्यावरच इथे प्रवेश दिला जात होता.
भूपिंदर सिंग यांच्या 365 राण्यांपैकी 10 प्रमुख राण्या होत्या. या राण्यांपासून महाराजांना 83 मुले झाली. भूपिंदर सिंग यांचे त्यांच्या राण्यांवर खूप प्रेम होते. आपल्या राण्यांच्या प्रेमापोटी तो आपल्या महालात रोज 365 कंदील प्रज्वलित करत असे. या सर्व कंदिलांवर त्यांच्या राण्यांची नावे लिहिली होती.
महाराजा भूपिंदर सिंग यांनाही मद्यपानाची आवड होती. सध्या लोकप्रिय असलेल्या पटियाला पेगचा शोध त्यांनीच लावला होता. भूपिंदर सिंग यांच्या राजवाड्यात 44 रोल्स रॉयस कार होत्या. यातील 20-22 रोल्स रॉयस ते दैनंदिन राजवाड्याच्या कामासाठी वापरत असे. त्याच्याकडे तीन खासगी जेटही होते.
वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात. यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.
...Read More|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
AUS
(20 ov) 186/6
|
VS |
IND
188/5(18.3 ov)
|
| India beat Australia by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(49.5 ov) 271
|
VS |
USA
273/6(49 ov)
|
| USA beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.