मनोक कुलकर्णी आणि कुणाल जमदाडे (प्रतिनिधी) मुंबई : भारत आणि पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सतर्क झालं आहे. राज्यातील प्रमुख शहरांसह मंदिरांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मंदिर प्रशासनानेही आता भाविकांसाठी नियमावली ठरवली आहे. राज्यात सुरक्षेसंदर्भात काय पाऊलं उचलण्यात आलीयेत याबाबत जाणून घेऊयात.
ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणी पाकमध्ये प्रचंड तणाव आहे. सध्या दोन्ही देशांत शस्त्रसंधी झालेली असली तरी परिस्थिती पूर्णपणे निवळलेली आहे. त्यामुळेच खबरदारी म्हणून संपूर्ण देशातील सुरक्षा यंत्रणा हायअलर्टवर आहे. कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी भारतीय सैन्य, स्थानिक पोलीस दक्ष आहेत. राज्यातील मुंबईसह महत्वाची शहरं आणि मंदीरांची सुरक्षा आता वाढवण्यात आली आहेत. मंदिर परिसरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला असून भाविकांची कसून तपासणी केली जाईल. मुंबईतल्या सिद्धीविनायक, शिर्डीतल्या साईमंदीराच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सोबतच मंदीर प्रशासनाने काही नियमही जारी केले.
मंदिरात फुलं आणि हार अर्पण करण्यावर बंदी
भाविकांनी प्रसाद आणण्यासही मनाई
मंदिरात नारळ आणू नये, अशा सूचना
भाविकांनी मंदिर संस्थानच्या नियमांचं पालन करण्याचं आवाहन
भारत - पाक तणाव असताना महाराष्ट्र सतर्क आहे, सुरक्षेची चोख व्यवस्था आहे. अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये आता युद्धबंदी असली तरी पाक कधीही आगळीक करू शकतो. त्यामुळे सीमाभागासह पूर्ण देशातही सुरखा चोख ठेवण्यात आली आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकने सीमावर्ती भागातील शंभू मंदिर आणि गुरुद्वारावर हल्ल्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे आता राज्यातील मंदीरांनी काळजी घेत नियम जारी केले आहेत.