भारतात दररो मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाचे उत्पादन होते. तेल उत्पादनाच्या बाबतीत जागतिक क्रमवारी भारत 25 व्या स्थानी आहे. सर्वात जास्त कच्च्या तेलाचे उत्पादन महाराष्ट्रात होते.

India Daily Crude Oil Production : इराण, इस्त्रायल आणि अमेरिकेमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर जगभरात मोठं ऊर्जा संकट निर्माण झालं आहे. कच्च्या तेलाची वाहतूक जवळपास थांबली आहे. यामुळे सर्वच देश तेल साठे वाढवत आहेत. भारताने देखील आपली तेल उत्पादन क्षमता वाढली आहे. भारतातील अनेक राज्यांमध्ये तेलाच्या खाणी आहेत. भारतात सर्वात जास्त कच्च्या तेलाचे उत्पादन महाराष्ट्रात होते. जाणून घेऊया भारतात कुठे कुठे तेलखाणी आहेत. भारतात दररोज किती कच्च्या तेलाचे उत्पादन होते?
भारत अनेक देशांमधून तेल आयात करत असला तरी जगातील आघाडीच्या उत्पादकांपैकी एक आहे. भारत दररोज लाखो बॅरल कच्च्या तेलाचे उत्पादन केले जाते. जे देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी आणि ऊर्जा सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. भारत अनेक देशांना तेल पुरवठा करतो. भारतात दररोज सरासरी 580,000 ते 600,000 बॅरल कच्च्या तेलाचे उत्पादन होते. नवीन तंत्रज्ञान आणि शोधांनुसार हा हा आकडा बदलत आहे.
जगातील 10 प्रमुख तेल उत्पादनाच्या यादीत इराण, रशिया, सौदी अरेबियासह अनेक देशांचा समावेश आहे. भारत या देशांच्या यादीत नसला तरी कच्च्या तेलाच्या उत्पादनात भारत जगातील पहिल्या 25 देशांमध्ये आहे. भारताच्या विकसनशील अर्थव्यवस्थेसाठी ही एका अभिमानाची बाब आहे.
भारताच्या एकूण देशांतर्गत उत्पादनात राजस्थान राज्य पहिल्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर गुजरात आणि आसामचा क्रमांक तिसरा लागतो. यानंतर महाराष्ट्राचा नंबर लागतो. असे असले तरी भारतात सर्वात जास्त कच्च्या तेलाचे उत्पादन महाराष्ट्रात होते
महाराष्ट्रात मुंबईच्या समुद्राच्या मध्यभागी असलेले बॉम्बे हाय (मुंबई ऑफशोअर) हे भारतातील सर्वात मोठे आणि सर्वात जुने तेलक्षेत्र आहे. देशातील सर्वाधीत कच्च्या तेलाचे उत्पादन येथेच होते. येथूनच देशाला मोठ्या प्रमाणात कच्चे तेल मिळते. भारतातील बहुतांश तेल शोध आणि उत्खननाचे काम सरकारी कंपनी ओएनजीसी (तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ) द्वारे केले जाते.
देशांतर्गत उत्पादन असूनही, भारत आपल्या कच्च्या तेलाच्या गरजेपैकी सुमारे 85 टक्के तेल परदेशातून आयात करतो, कारण मागणी उत्पादनापेक्षा खूप जास्त आहे. अलीकडे बंगाल खोरे आणि कावेरी खोरे यांसारख्या नवीन क्षेत्रांमध्ये तेलाचा शोध लागला असून, त्यामुळे भविष्यात उत्पादन वाढण्याची अपेक्षा आहे. देशांतर्गत उत्पादन वाढवल्याने देशाच्या परकीय चलन साठ्याची बचत होते आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाच्या किमतींमधील चढउतारांचा प्रभाव कमी होतो. भारत दररोज 952,481 बॅरल कच्चे तेल उत्पादन करतो आणि देशाचा एकूण तेलसाठा 4,980,857,000 बॅरल आहे.