Manu Bhaker वर कोसळला दु:खाचा डोंगर, रस्ते अपघातामध्ये आजी आणि काकांचा मृत्यू

Manu Bhaker: मनू भाकर यांच्या आजीचे नाव सावित्री देवी आणि मामाचे नाव युद्धवीर होते. 

प्रविण दाभोळकर | Updated: Jan 19, 2025, 01:17 PM IST
Manu Bhaker वर कोसळला दु:खाचा डोंगर, रस्ते अपघातामध्ये आजी आणि काकांचा मृत्यू
मनू भाकेर

Manu Bhaker: पॅरीस ऑलिम्पिक 2024मध्ये दुहेरी मेडलिस्ट असलेल्या  आंतरराष्ट्रीय नेमबाजी खेळाडू मनू भाकेरवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तिच्या आजी आणि मोठ्या मामाचे रस्ते अपघातात निधन झाले आहे. महेंद्रगड बायपास रोडवर एका स्कूटर आणि ब्रेझा कारमध्ये भीषण टक्कर झाली. ही टक्कर इतकी भयानक होती की मनु भाकरचे आजोबा आणि मामा यांचा मृत्यू झाला. 

Add Zee News as a Preferred Source

या अपघातानंतर कार चालक घटनास्थळावरून पळून गेला. मनू भाकर यांच्या आजीचे नाव सावित्री देवी आणि मामाचे नाव युद्धवीर होते. पोलिसांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.

मनू भाकरच्या आजी आणि मामाचे दुःखद निधन 

भारतीय स्टार नेमबाज मनू भाकरची 70 वर्षांची आजी सावित्री देवीदेखील राष्ट्रीय स्तरावर पदके जिंकणारी खेळाडू होती. तर मोठा मामा युद्धवीर रोडवेज ड्रायव्हर होता. दोघांचाही रस्ता अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तात्काळ मृतदेह ताब्यात घेतपोस्टमॉर्टमसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवला. सध्या पोलीस पथके या अपघाताचा तपास करत आहेत.

समोर आलेल्या रिपोर्टनुसार, युद्धवीर यांचे घर महेंद्रगड बायपासवर आहे आणि ते स्कूटरवरून त्यांच्या ड्युटीवर जात होते. युद्धवीरने त्याच्या आईला आणि मनु भाकरच्या आजीला एकत्र बसवले. युद्धवीर सावित्री देवींना त्यांच्या धाकट्या भावाच्या घरी सोडणार होता. ते महिंदरगड रोडवरील कालियाना वळणावर पोहोचले तेव्हा कार चुकीच्या बाजूने येत होती. त्यानंतर दोघांचीही टक्कर झाली. गाडी खूप वेगाने जात होती आणि धडकेनंतर ती उलटली. यात मनू भाकेरची आजी आणि मामा मरण पावले.

About the Author

Pravin Dabholkar

"प्रवीण सुरेश दाभोळकर हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये चीफ सब एडीटर पदावर कार्यरत आहेत त्यांना मीडिया क्षेत्राचा 14 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल मीडियासह विविध माध्यमांमध्ये काम केले आहे. संशोधनात्मक अहवाल आणि फिचर रायटिंगकडे त्यांचा कल आहे. वाचकांना माहिती नसलेल्या कथा लोकांसमोर आणण्याची त्यांना आवड आहे. हे करीत असताना सविस्तर तपशील आणि अचूकतेकडे त्यांची कटाक्षाने नजर असते. फावल्या वेळात प्रविण आपल्या आनंदासाठी फिरणे, नवीन गोष्टी आत्मसात करणे आणि सामाजिक कार्यात गुंतलेले असतात. त्यांचे लेखन अनेकदा सामाजिक न्यायाच्या समस्यांबद्दलची त्यांची उत्कटता दर्शवते. तसेच आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात."

...Read More