Mark Zuckerberg : 'मार्क झकरबर्गला माफी मागावी लागेल!' भारताबद्दल असं काय बोलला मेटा संस्थापक? मंत्री भडकले

Mark Zuckerberg's Controversial Statement : मेटाचे सीईओ मार्क झकरबर्ग यांनी एका पॉडकास्टमध्ये कोरोनानंतरच्या परिस्थितीवर भाष्य करत भारताविषयी मोठं आणि धक्कादायक विधान केलं. त्यानंतर भारताने त्यांच्या विरोधात मोठं पाऊल उचलंय. 

नेहा चौधरी | Updated: Jan 14, 2025, 06:21 PM IST
Mark Zuckerberg : 'मार्क झकरबर्गला माफी मागावी लागेल!' भारताबद्दल असं काय बोलला मेटा संस्थापक? मंत्री भडकले
Mark Zuckerberg's Controversial Statement

Meta To Get Parliamentary Panel Summons Over Zuckerberg's India Poll Remark : गेल्या काही दिवसांपासून मेटाचे सीईओ मार्क झकरबर्ग चांगलेच चर्चेत आहे. त्यांनी गेल्या शुक्रवारी 10 जानेवारी 2025 ला एका पॉडकास्टमध्ये कोरोनानंतरच्या परिस्थितीवर भारताविरोधात मोठं विधान केलंय. त्यानंतर केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मार्क यांच्या दाव्यावर टीका केलीय. तरदुसरीकडे भारताची संसदीय समिती META ला मानहानीसंबंधी समन्स पाठवणार असल्याच सांगितलं. शिवाय मार्क झकरबर्ग यांना माफी मागावी लागेल असंही स्पष्ट केलंय. त्यामुळे मार्क झकरबर्ग यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. 

Add Zee News as a Preferred Source

भाजप खासदार आणि कम्युनिकेशन-माहिती तंत्रज्ञानाच्या स्थायी समितीचे अध्यक्ष निशिकांत दुबे यांनी म्हटलंय की, चुकीची माहिती पसरवल्याबद्दल 'मेटा'नं माफी मागावी. आम्ही मेटाच्या लोकांना कॉल करणार आहोत. झकरबर्ग यांनी कोरोना काळानंतर सरकारविरोधात वातावरण तयार झाल्याचं विधान केलं. त्यात भारताचा उल्लेख केलाय. मेटावाल्यांना भारत सरकारची माफी मागावी लागणार आहे, अन्यथा आमची समिती कारवाई करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. आम्ही समिती सदस्यांशी बोलणार असून मेटावाल्यांना 20 ते 24 जानेवारी दरम्यान उपस्थित राहण्यास सांगणार आहोत, असं ते म्हणाले. 

मार्क झकरबर्गचा दावा तथ्यात्मकदृष्ट्या अत्यंत चुकीचा - अश्विनी वैष्णव 

मार्क झकरबर्गच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना अश्विनी वैष्णव म्हणाले की, 'भारतातील जनतेने मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीएवर विश्वास व्यक्त केला आहे. 2024 मध्ये भारतात निवडणूक पार पडली ज्यामध्ये तब्बल 64 कोटी लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएवर विश्वास दाखवला. त्यामुळे 2024 मध्ये भारतासह बहुतांश विद्यमान सरकारे कोविडमुळे पराभूत झाली हा मार्क झुकरबर्गचा दावा तथ्यात्मकदृष्ट्या अत्यंत चुकीचा आहे.'

मार्क झकरबर्ग नेमकं काय म्हणाले होते?

मार्क झकरबर्ग जो रोगन यांच्यासोबत पॉडकास्टमध्ये जी मुलाखत दिली त्यात म्हटलं की, गेल्या वर्षात जागतिक पातळीवर अनेक मोठ्या घटना घडल्या. त्यात महागाई, कोरोनामुळ निर्माण झालेल्या परिस्थितीचा अनेक देशांतील सत्ताधारी पक्षाला सामना करावा लागला. भारतासह जगभरातील विविध देशांतील सरकारांनी कोरोनाकाळात राबवण्यात आलेल्या आर्थिक धोरणांमुळे आणि त्यादरम्यान घडलेल्या नकारात्मक घडामोडींचा परिणाम लोकांची नाराजी आणि संताप निवडणूक निकालांत दिसून आला. जगभरात ज्या ज्या ठिकाणी निवडणुका झाल्या, त्या त्या ठिकाणी सत्तेतील सर्व लोक हरले .नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारही निवडणुकीत हरले, असं विधान झकरबर्गनं केलंय. 

 

About the Author

Neha Choudhary

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला,  26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत. इथे त्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही त्या लिखाण करतात. तर आरोग्य, लाइफस्टाइल या बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. तर गेल्या 2 वर्षांपासून त्यांनी ज्योतिष आणि धर्म यावर काम करत आहेत. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व याची त्या त्यांचा बातम्यांमधून समतोल राखतात. त्यांच्या मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, संगीताची आवड आहे. 

...Read More