Meerut Husband Murder Case Black Magic : सध्या सगळीकडे यूपीच्या मेरठमध्ये घडलेल्या हत्याप्रकरणाची चर्चा सुरु आहे. बायकोनं नवऱ्याची हत्या करून त्याचे 15 तुकडे केले आणि प्लास्टिकच्या ड्रममध्ये सिमेंटने सील केले. मर्चंट नेव्ही ऑफिसर असलेल्या सौरभ राजपूतच्या हत्याप्रकरणाची सगळीकडे चर्चा सुरु आहे. त्याची पत्नी मुस्कान रस्तोगीनं त्याची निर्घृण हत्या केली. मुस्काननं तिचा प्रेमी असलेल्या साहिल शुक्लाला दैवी शक्ती आणि अलौकिक शक्तींचा उल्लेख करून तिच्या प्रियकराला फसवले आणि सांगितले की देवीने तिला सौरभला मारण्यास सांगितले होते. आता या खून प्रकरणात काळ्या जादूचा अँगलही समोर येत आहे. मुस्कानचा प्रियकर साहिल, ज्यानं तिला या गुन्ह्यात मदत केली होती. त्याच्या घरातून पोलिसांना अनेक विचित्र गोष्टी सापडल्या आहेत.
या सगळ्या गोष्टी त्याच ठिकाणी मिळाल्या ज्या ठिकाणी तिनं सौरभची हत्या केल्यानंतर त्याचं शीर आणि हात बॅगमध्ये ठेवून आणलं होतं. पोलिसांनी या घराचा संपूर्ण तपास केला आणि त्यातून काही तरी एक वेगळंच चित्र समोर आलं आहे. इथल्या भिंतीवर अनेक अनपेक्षित गोष्टी दिसून आल्या. साहिलनं या भिंतींवर महादेव यांचा फोटो बनवला होता. त्याशिवाय तंत्र क्रिये संबंधीत मोठं चित्र एका ठिकाणी दिसलं. स्केच पेनच्या मदतीनं त्यानं हे सगळे चित्र बनवले होते. त्या रूममध्ये एक मांजर देखील सापडली, ती त्याची पाळीव मांजर असल्याचे समजले.
एसपी सिटी आयुष विक्रम सिंह यांनी पोलिस लाइनला सौरभ हत्येप्रकरणातील अनेक खुलासे केले आहेत. त्यांनी सांगितलं की सोरभला मद्यपान करण्याची सवय होती. मस्कानचे नवऱ्यासोबत काही वाद होते. दुसरीकडे 2019 मध्ये मुस्कान तिच्या एका जुन्या प्रियकरासोबत प्रेमसंबंध सुरु झाले. त्यामुळेच मुस्काननं सौरभची हत्या करण्याचा निर्णय घेतला. साहिल दैवी शक्तींवर विश्वास करत होता, त्यामुळे मुस्काननं या सगळ्याचा फायदा घेतला. मुस्कान सतत साहिलला सांगत होती की तिला दिव्य आणि अलौकिक शक्ती आजुबाजूला असल्याचं जाणवत असल्याचं सांगितलं.
मुस्कान साहिलला महादेव आणि स्वत: ला पार्वती म्हणायची. मुस्काननं साहिलला सांगितलं की देवीनं सौरभचा वध करण्यास सांगितलं आहे. 3/4 मार्चच्या रात्री सौरभला जेवणात बेशुद्धीचं औषध दिलं. मध्यरात्री जवळपास 1 च्या दरम्यान, साहिलला घरी बोलावलं. बेशुद्ध असलेल्या सौरभच्या छातीत मुस्कान आणि साहिलनं एकत्र मिळून चाकू खुपसला. त्यानंतर शीर आणि दोन्ही हात कापून बॅगमध्ये बंद केलं. मृतदेह प्लास्टिकच्या बॅगमध्ये गुडाळून बेडमध्ये बंद केलं. चार मार्चला प्लास्टिकचा ड्रम घेऊन त्यात सिमेंट टाकून बॉडी लपवण्याचा प्रयत्न केला.
एसपी सिटीनं सांगितलं की सौरभचा पासपोर्ट एक्सपायर होणार होता. पासपोर्ट रिन्यू करण्यासाठी सौरभ मेरठ आला होता. नवीन पासपोर्ट मिळाल्यानंतर एप्रिलमध्ये परत इंग्लंडला जाणार होता. या दरम्यान, मुस्काननं हत्या केली. 25 फेब्रुवारी रोजी मुस्काननं सौरभची हत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तिनं दारूत बेशुद्ध करण्याचं औषध टाकलं. तर सौरभनं त्याची तब्येत खराब असल्याचं सांगत मद्यपान केलं नाही आणि त्या दिवशी तो बचावला.
हेही वाचा : 'मी माधुरीला ठेल्यावर टॉर्चर केलं!' खलनायकानं सांगितला विनयभंगाच्या सीनचा किस्सा; म्हणाला, 'ती खूप...'
मुस्काननं तिच्या प्रेमी साहिलला कायमच तिच्या नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला. मुस्काननं तिचा भाऊ आणि आईच्या नावावर दोन स्नॅपचॅट आयडी देखील बनावले. त्यावरून ती स्वत: ला मेसेज पाठवत राहिली. कधी-कधी तिनं दाखवण्याचा प्रयत्न केला की साहिलच्या दिवंगत आईची आत्मा ही मुस्कानच्या भावाच्या शरिरात येऊन गप्पा मारते. त्यानंतर ते मेसेज साहिलला वाचून दाखवायची. त्या दोन्ही आयडीवरून मुस्कान स्नॅपचॅटवरून स्वत: ला मेसेज करायची. त्यात साहिलविषयी चांगल्या गोष्टी लिहिल्या होत्या. त्यावरून तिनं साहिलला हे दाखवण्याचा प्रयत्न केला की ते दोघं एकमेकांना भेटतात यावर त्याच्या पुर्वजांना काही विरोध नाही.