मेरठमधील सौरभ राजपूत हत्याकांड प्रकरणाच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासे

Meerut Murder Case: मेरठ हत्या प्रकरणातील पोस्टमार्टम अहवालात पीडित सौरभच्या मृत्यूबाबत धक्कादायक खुलासे झाले आहेत. या पोस्टमार्टम रिपोर्टने मारेकरांची क्रूरता दाखवून दिली आहे.   

तेजश्री गायकवाड | Updated: Mar 24, 2025, 09:28 AM IST
मेरठमधील सौरभ राजपूत हत्याकांड प्रकरणाच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासे
Meerut Saurabh Shocking Post-mortem Report

Meerut Saurabh Shocking Postmortem Report: मेरठच्या सौरभ हत्या प्रकरणाचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आला आहे. या रिपोर्टने मारेकरांनी क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत हे दाखवून दिले आहे. सौरभची मान कापली, हात मनगटापासून कापण्यात आले आणि हृदयावर तीन वेळा वार करण्यात आल्याचे रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. मृत्यूचे कारण शॉक आणि जास्त रक्तस्त्राव असे रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे.

हत्येचा क्रूरपणा उघड 

माजी मर्चंट नेव्ही ऑफिसर सौरभ राजपूतच्या  पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. त्यातून त्याच्या हत्येचा अत्यंत क्रूरपणा उघड झाला आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये त्याच्या शरीराचे तुकडे केलेले सांगितले आहे. त्याचे हात मनगटावर कापले गेले होते आणि त्याचे पाय मागे वाकले होते, हे दर्शविते की त्याच्या शरीराचे तुकडे ड्रममध्ये ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. हा क्रूरपणा त्याची पत्नी मुस्कान रस्तोगी आणि तिचा प्रियकर साहिल शुक्ला यांनी केल्याचा अहवाल आहे. 

हे ही वाचा: Meerut Murder: मुलीला फाशीची मागणी करणाऱ्या आईचे भिंग फुटलं, जावईच्या सहानुभूतीचे कारण झाले उघड!

 

खून करून गेले हिमाचलला 

सौरभ राजपूतला त्याच्या पत्नीने 4 मार्च रोजी अंमली पदार्थ पाजून त्याची हत्या केली. यानंतर तिचा प्रियकर साहिल शुक्लाच्या मदतीने  त्याच्या मृतदेहाचे तुकडे करून सिमेंटने भरलेल्या ड्रममध्ये बंद करण्यात आले. यानंतर मुस्कान आणि साहिल हिमाचल प्रदेशात सुट्टीवर गेले. कुटुंबीयांची दिशाभूल करण्यासाठी आणि   गुन्हा लपविण्यासाठी त्यांनी सौरभच्या फोनवरून कुटुंबियांना मेसेज पाठवत राहिले. 18 मार्च रोजी राजपूतच्या कुटुंबाने तो बेपत्ता झाल्याची तक्रार केल्यावर खून उघडकीस आला, त्यानंतर मुस्कान आणि साहिलला अटक करण्यात आली.

हे ही वाचा: 'बायको आणि सासूने घर उद्ध्वस्त..', पती आत्महत्या करत असताना पत्नी आणि सासू 44 मिनिटं Live पाहत राहिल्या

 

काय म्हणाले डॉक्टर? 

पोस्टमार्टम करणाऱ्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, सौरभ राजपूतच्या हृदयावर तीन वेळा जोरदार वार करण्यात आले होते. हे वार फारच हिंसक हल्ल्याचे संकेत देते. पोलीस अधीक्षक आयुष विक्रम सिंग यांनी सौरभच्या पोस्टमार्टमबद्दल बोलताना मेनी केले की, मुस्कानने राजपूतवर चाकूने वार केले, नंतर त्याची मान आणि हात कापले. त्यानंतर ड्रममध्ये बसवण्यासाठी मृतदेहाचे चार तुकडे करण्यात आले.