Meerut woman: उत्तर प्रदेशातील मेरठ शहरात कथितरित्या एका लहान मुलासोबत दुर्दैवी घटना घडली. सुमारे 8 ते 10 वर्षांच्या या मुलाने टीपी नगर भागातील एका खोल नाल्यात कचरा गोळा करत असताना पडल्याची तक्रार महिलेने केली. ही घटना 26 जानेवारी रोजी दुपारी घडली होती. तिने 112 या आपत्कालीन क्रमांकावर माहिती देताच पोलिस आणि प्रशासन तातडीने हलले. या दुर्घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. असे असले तरी मुलाचा शोध घेता आला नाही. दरम्यान अधिकाऱ्यांना आता वेगळाच संशय आलाय.
कचरा उचलत असताना मुलगा नाल्यातील पाण्याच्या प्रवाहात किंवा असमतोलामुळे पडला असावा, असे त्याच्या आईचे म्हणणे आहे. कर्मचारी घटनास्थळी पोहोचले पण नाला खोल आणि गढूळ असल्याने त्याला ताबडतोब शोधणे कठीण झाले. घटनास्थळी उपस्थित लोकांनी तातडीने मदत मागवली पण मुलाचा त्वरित ठावठिकाणा लागला नाही. या नाल्यात कचरा आणि गाळ साचलेला असल्याने बचावकार्य अधिक आव्हानात्मक बनले. मुलाची ओळख अद्याप गुप्त ठेवण्यात आलीय.
माहिती मिळताच टीपी नगर पोलीस ठाण्याचे इन्स्पेक्टर अरुण मिश्रा स्वतः नाल्यात उतरले आणि शोधमोहीम सुरू केली. पोलिस, नगरपालिका आणि आपत्ती निवारण पथक एकत्रितपणे कार्यरत झाले. जेसीबी यंत्रांच्या साहाय्याने नाल्यातील वेगवेगळ्या भागात खोदकाम सुरू करण्यात आले.
बचावकार्य 18 तासांपेक्षा अधिक काळ सुरू होते. सोमवार दुपारपासून ते मंगळवार सकाळपर्यंत अखंडपणे चालू होते. विविध यंत्रसामग्री आणि मनुष्यबळाचा वापर करून नाल्यातील प्रत्येक भाग तपासण्यात आला. तरीही मुलाचा काहीच ठावठिकाणा लागलेला नाही. प्रशासनाने या प्रकरणाला गांभीर्याने घेतले असून, कुटुंबीय न सापडल्यानेही शोध थांबला नव्हता.
हा कॉल खोटा होता. वर्षानुवर्षे घाणेरडा आणि तुंबलेला नाला साफ करण्यासाठी होता, असा संशय अधिकाऱ्यांना आता येतोय. खोटी माहिती दिल्याबद्दल आणि सरकारी संसाधनांचा अपव्यय केल्याबद्दल पोलिस आता महिलेवर कारवाई करणार असल्याचं सांगितलं जातंय. ही घटना सोशल मीडियावर व्हायरल होतेय. ज्यामुळे मूलभूत नागरी समस्या फक्त तेव्हाच का सोडवल्या जातात? याबद्दल चर्चा सुरू झाली आहे.
"प्रवीण सुरेश दाभोळकर हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये चीफ सब एडीटर पदावर कार्यरत आहेत त्यांना मीडिया क्षेत्राचा 14 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल मीडियासह विविध माध्यमांमध्ये काम केले आहे. संशोधनात्मक अहवाल आणि फिचर रायटिंगकडे त्यांचा कल आहे. वाचकांना माहिती नसलेल्या कथा लोकांसमोर आणण्याची त्यांना आवड आहे. हे करीत असताना सविस्तर तपशील आणि अचूकतेकडे त्यांची कटाक्षाने नजर असते. फावल्या वेळात प्रविण आपल्या आनंदासाठी फिरणे, नवीन गोष्टी आत्मसात करणे आणि सामाजिक कार्यात गुंतलेले असतात. त्यांचे लेखन अनेकदा सामाजिक न्यायाच्या समस्यांबद्दलची त्यांची उत्कटता दर्शवते. तसेच आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात."
...Read More|
SL-A
|
VS |
OMA
|
| Oman beat Sri Lanka A by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
SL-A
|
VS |
OMA
|
| Oman beat Sri Lanka A by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
ITA
|
VS |
CAN
|
| Italy beat Canada by 10 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.