I Am Sorry India...Mark Zuckerberg च्या 'त्या' वक्तव्यानंतर Meta ने मागितली मोदी सरकारची माफी

Meta Apologized to India : मार्क झकरबर्ग च्या 'त्या' वक्तव्यानंतर Meta अखेर मोदी सरकारची माफी मागावी लागली. मार्क झकरबर्ग यांच्या त्या एका वक्तव्यामुळे भारतीय मंत्री भडकले होते.  

नेहा चौधरी | Updated: Jan 15, 2025, 07:10 PM IST
I Am Sorry India...Mark Zuckerberg च्या 'त्या' वक्तव्यानंतर  Meta ने मागितली मोदी सरकारची माफी

Meta Apologized to India : मेटाचे सीईओ मार्क झकरबर्ग यांनी गेल्या शुक्रवारी 10 जानेवारी 2025 ला एका पॉडकास्टमध्ये भारत सरकारविरोधात धक्कादायक विधान केलं होतं. त्यानंतर भारतात मार्क झकरबर्ग विरोधात संतापाची लाट पसरली होती. मेटावाल्यांना भारत सरकारची माफी मागावी असं भाजप खासदार आणि कम्युनिकेशन-माहिती तंत्रज्ञानाच्या स्थायी समितीचे अध्यक्ष निशिकांत दुबे म्हटलं होतं. त्यानंतर मार्क झकरबर्ग यांच्या त्या एका वक्तव्यामुळे Meta अखेर मोदी सरकारची माफी मागावी लागली. 

Add Zee News as a Preferred Source

फेसबुकची मूळ कंपनी मेटाने माफी मागताना त्यांनी लिहिलंय की, भारत हा मेटासाठी महत्त्वाचा देश आहे. नकळत झालेल्या चुकीबद्दल आम्ही माफी मागू इच्छितो. 

मार्क झकरबर्ग काय म्हणाले होते?

मार्क झकरबर्ग त्या मुलाखतीत म्हणाले होती की, कोरोना-19 नंतर जगभरातील सरकारवरील लोकांचा विश्वास डळमळीत झाला आहे. यामुळे ते हरले. या वक्तव्यात भारताचाही उल्लेख मार्क यांनी केला होता. त्यावर भारताकडून तीव्र आक्षेप व्यक्त करण्यात आला. 

गेल्या वर्षात जागतिक पातळीवर अनेक मोठ्या घटना घडल्या. त्यात महागाई, कोरोनामुळ निर्माण झालेल्या परिस्थितीचा अनेक देशांतील सत्ताधारी पक्षाला सामना करावा लागला. भारतासह जगभरातील विविध देशांतील सरकारांनी कोरोनाकाळात राबवण्यात आलेल्या आर्थिक धोरणांमुळे आणि त्यादरम्यान घडलेल्या नकारात्मक घडामोडींचा परिणाम लोकांची नाराजी आणि संताप निवडणूक निकालांत दिसून आला. जगभरात ज्या ज्या ठिकाणी निवडणुका झाल्या, त्या त्या ठिकाणी सत्तेतील सर्व लोक हरले .नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारही निवडणुकीत हरले, असं विधान झकरबर्गनं केलंय. 

त्यानंतर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मार्क झकरबर्गच्या वक्तव्यावर प्रत्युत्तर देत त्यांचे विधान 'तथ्यत: चुकीचे' असल्याचं म्हटलं. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट लिहिली होती 
तर अश्विनी वैष्णव म्हणाले की, 'भारतातील जनतेने मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीएवर विश्वास व्यक्त केला आहे. 2024 मध्ये भारतात निवडणूक पार पडली ज्यामध्ये तब्बल 64 कोटी लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएवर विश्वास दाखवला. त्यामुळे 2024 मध्ये भारतासह बहुतांश विद्यमान सरकारे कोविडमुळे पराभूत झाली हा मार्क झुकरबर्गचा दावा तथ्यात्मकदृष्ट्या अत्यंत चुकीचा आहे.'

 

About the Author

Neha Choudhary

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला,  26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत. इथे त्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही त्या लिखाण करतात. तर आरोग्य, लाइफस्टाइल या बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. तर गेल्या 2 वर्षांपासून त्यांनी ज्योतिष आणि धर्म यावर काम करत आहेत. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व याची त्या त्यांचा बातम्यांमधून समतोल राखतात. त्यांच्या मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, संगीताची आवड आहे. 

...Read More