नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्रालयाने माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना असलेली विशेष सुरक्षा दलाची (एसपीजी) सुरक्षाव्यवस्था हटवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात येईल. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून याबाबत स्पष्टीकरणही देण्यात आलेले आहे. 
 
 सध्या विविध नेत्यांच्या सुरक्षेचा घेण्यात येणारा आढावा घेतला जात आहे, ही प्रक्रिया निरंतर सुरु असते. सुरक्षा संस्थांकडून संबंधित व्यक्तीला असलेला धोका लक्षात घेऊन अत्यंत व्यवसायिक पद्धतीने त्याचे मूल्यमापन केले जाते. यानंतर संबंधित व्यक्तीला कोणत्या प्रकराची सुरक्षा पुरवायची हा निर्णय घेतला जातो. 
 
 त्यामुळे आता मनमोहन सिंग यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात येईल. काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने काही खासदारांची सुरक्षाही काढून घेतली होती. त्यामुळे १३०० पेक्षा अधिक कमांडोंचे मनुष्यबळ उपलब्ध झाले होते. यासाठी गृह मंत्रालयाने ३५० अतिमहत्त्वाच्या लोकांच्या सुरक्षेचा आढावा घेतला होता.