किशोरवयीन मुलीला बेशुद्ध करून पोलिसांनीच केला गैरप्रकार...

उत्तरप्रदेशातील मथुरा येथे चक्क पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Sep 29, 2017, 09:34 PM IST
 किशोरवयीन मुलीला बेशुद्ध करून पोलिसांनीच केला गैरप्रकार...  title=

मथुरा : उत्तरप्रदेशातील मथुरा येथे चक्क पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिडीत मुलगी किशोरी हिला बेशुद्ध करून तिच्यासोबत गैरवर्तन केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधीक्षक अधिक तपासणी करत आहे. 

वरिष्ठ पोलीस अधीक्षक स्वप्निल ममगई यांनी सांगितले की, "गोविंद नगर भागात राहणाऱ्या दोन किशोरवयीन मुलींच्या आईने सांगितले की, "रमाकांत पांडे आणि कॉन्स्टिबल प्रवीण उपाध्याय यांनी माझ्या १५ वर्षांच्या मुलीला बेशुद्ध करून तिच्यासोबत गैरवर्तन केले."

पिडीत मुलीने सांगितले की, "हे पोलीस कर्मचारी त्यांच्या घरात भाड्याने राहतात. त्यामुळे ओळख होती. २० सप्टेंबरला ट्युशनला जाताना ते बोलण्यात गुंतवून बाईकवरून गोविंदनगरातील गेस्ट हाऊसमध्ये घेऊन गेले आणि त्या ठिकाणी लहान बहिणीला बाथरूममध्ये कोंडून माझ्यासोबत गैरप्रकार केला."

वरिष्ठ पुलिस अधीक्षक ममगई यांनी तपासणी करून दोघांना निलंबित केले.