नवी दिल्ली : नक्षलवादी संघटनांनी देशभरातल्या तब्बल ११ मोठ्या शहरांमध्ये आपलं नेटवर्क उभारलं होतं असा गृहमंत्रालयाला गुप्तहेर संस्थांनी अहवाल दिला आहे. गृहमंत्रालयाला आलेला हा अहवाल झी मीडियाच्या हाती लागलाय. दिल्ली, मुंबई, कोलकाता, चंदीगड, रांची, हैदराबाद, नागपूर, पुणे, विशाखापट्टणम, तिरूवनंतपुरम, मदुराई या शहरात शहरी नक्षलवाद्यांचं जाळं उभारलं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


उच्चशिक्षीत विद्यार्थ्यांमध्ये नक्षली गटांविषयी सहानुभूती निर्माण करण्याचा आणि नक्षली संघटनांमध्ये भरती करण्याचा मोठा कट यातून उघड झालाय. सेंट्रल कमिटी ऑफ सीपीआय (माओवादी) मार्फत दलित आणि अल्पसंख्य समाजात सरकारविरोधात असंतोष निर्माण करून असंतोष निर्माण करण्याचा कट यातून उघड झाला आहे.