सासू असावी तर अशी! आईने नकार दिला पण सासूच्या एका निर्णयाने सुनेला मिळालं जीवनदान

पूजाला फेब्रुवारीमध्ये एका मुलीला जन्म दिला पण या प्रसूतीदरम्यान तिला पोटात गंभीर संसर्ग झाला. तिच्या दोन्ही किडन्या 75% पर्यंत खराब झाल्या. 

नेहा चौधरी | Updated: Oct 5, 2025, 02:07 PM IST
सासू असावी तर अशी! आईने नकार दिला पण सासूच्या एका निर्णयाने सुनेला मिळालं जीवनदान

Viral News : आई लेकरांसाठी काहीही करु शकते. 9 महिने बाळाला पोटात वाढवायचं नंतर त्यांच्या जन्मानंतर त्यांना सर्व संकटापासून वाचविण्यासाठी आई त्याला आपल्या सावलीत लहानाचं मोठं करतं. आपल्या पोरावर कोणतही संकट आलं की, आई त्याच्यासमोर ढाल म्हणून उभी असते. पूजा हिच्यावर लग्नानंतर प्रसूतीदरम्यान पोटात गंभीर संसर्ग झाल्यामुळे जीवावर बेतली. तिच्या दोन्ही किडन्या 75% पर्यंत खराब झाल्यात. त्यानंतर आईने तिचा जीव वाचविण्यासाठी पुढाकार न घेता माघार घेतला. पण अशातच तिच्यासाठी देवदूत म्हणून तिच्या सासूने जे केलं त्यानंतर सर्वत्र त्यांचं कौतुक होतं. (mother in law gave her kidney to daughter in law kidney donation after her mum backs out viral news in marathi)

Add Zee News as a Preferred Source

सासू असावी तर अशी!

प्रत्येकासाठी प्रेरणादायी अशी कहाणी, मनाला जाऊन भेडते. अगदी पूर्वापरपासून सासू सुनेचं नातं हे फार बदनाम आहे. चित्रपट असो किंवा मालिका यातही सासू सुनेचं नातं शत्रूचं दाखवलं जातं. हल्ली काळ बदलला आहे, आज सुनेच्या मागे सासू आईसारखी खंबीरपणे उभी असते. पणदुसरीकडे आजही अशा सासू दिसतात ज्या सुनेवर अत्याचार करतात. त्यांना मानसिक त्रास देतात. पण पूजाची सासूने जे केलं त्यानंतर प्रत्येक सून म्हणेल सासू असावी तर अशी...

खरंतर ही सासू नाहीच ती आईच आहे..., आई ही प्रेमाने भरलेली असते, त्याच्या पंखाखाली येणाऱ्या प्रत्येक मुलांवर ती प्रेम करते. मुलाच लग्न झाल्यावर घरात येणाऱ्या सुनेवरही ती खूप माया करते. लखनऊमधील अलीगंज परिसरातील रामनगर गावात राहणाऱ्या सासूचं सध्या सगळीकडे कौतुक होतंय.

फर्रुखाबादची पूजा हिचं लग्न नोव्हेंबर 2023 मध्ये एटामधील अश्विनीन प्रताप सिंगशी झालं होतं. फेब्रुवारीत पूजाने एका मुलीला जन्म दिला. पण प्रसुतीदरम्यान तिला पोटात गंभीर संसर्ग झाला. त्याचा परिणाम म्हणजे तिच्या दोन्ही किडन्या 75 टक्के खराब झाल्यात. तिच्यावर जीववर संकट आलं होतं. 

कुटुंबाने कानपूरमधील अनेक रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी धावपळ केली, पण काही उपयोग झाला नाही. शेवटी पूजाला लखनऊमधील डॉ. राम मनोहर लोहिया रुग्णालयात रेफर करण्यात आले. आरएमएलच्या डॉक्टरांनी सांगितलं की, पूजाचा जीव वाचवण्यासाठी मूत्रपिंड प्रत्यारोपण हा एकमेव पर्याय आहे.अशातच तिच्या आईने तिला किडनी देण्यास नकार दिला. पण अशात तिची सासूने पुढाकार घेतला आणि तिच्यासाठी देवदूत म्हणून समोर आली. 

सासू बीनम देवी, पुढे आल्यात त्यांच्या रक्तगटही जुळला आणि त्यांनी सुनेचा जीव वाचविण्यासाठी आपली किडनी दान केली. 13 सप्टेंबर रोजी आरएमएल येथे प्रत्यारोपण यशस्वी झाले. पूजा आता एक वर्ष डॉक्टरांच्या देखरेखीखाली असणार आहे. कुटुंब तिच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहे. सासूच्या या पुढाकारामुळे पूजाला आज नवीन आयुष्य मिळाले आहेत. 

पूजा म्हणाली, "माझ्या सासूने माझा जीव वाचवला. आता मी माझ्या मुलीला उचलून खेळू शकते. देव सर्वांना अशी सासू देवो." तर तिची सासू बीनम देवी म्हणाल्यात, "जेव्हा कोणीही मदत केली नाही, तेव्हा मी माझी किडनी माझ्या सुनेला दान केली आणि आज ती पूर्णपणे बरी आहे. ती माझी सून नाही मुलगी आहे."

जिथे आजही या सासूच्या छळामुळे सुने जीव देते, इथे अशी ही प्रेरणादायी कहाणी प्रत्येकाला नात्यांकडे सकारात्मकपणे बघण्याचा दृष्टिकोन देते. 

FAQ

1: ही कहाणी कशाबाबत आहे?
उत्तर: ही कहाणी आईच्या प्रेमाची आणि सासू-सुनेच्या नात्याची प्रेरणादायी उदाहरण आहे. लखनऊमधील पूजा ही गंभीर आजारी पडली आणि तिची सासू बीनम देवीने आपली किडनी दान करून तिचा जीव वाचवला. ही घटना सासू-सुनेच्या नात्यातील सकारात्मक दृष्टिकोन दाखवते.

2: पूजाला काय झाले?
उत्तर: पूजाला लग्नानंतर (नोव्हेंबर २०२३) फेब्रुवारी २०२४ मध्ये मुलीला जन्म दिला. प्रसूतीदरम्यान पोटात गंभीर संसर्ग झाला, ज्यामुळे तिच्या दोन्ही किडन्या ७५% खराब झाल्या. तिच्या जीवावर बेतली होती.

3: पूजाच्या उपचारांसाठी कुटुंबाने काय केले?
उत्तर: कुटुंबाने कानपूरमधील अनेक रुग्णालयांमध्ये धावपळ केली, पण उपयोग झाला नाही. शेवटी लखनऊमधील डॉ. राम मनोहर लोहिया (आरएमएल) रुग्णालयात रेफर केले गेले. डॉक्टरांनी मूत्रपिंड प्रत्यारोपण हा एकमेव पर्याय सांगितला.

About the Author

Neha Choudhary

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला,  26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत. इथे त्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही त्या लिखाण करतात. तर आरोग्य, लाइफस्टाइल या बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. तर गेल्या 2 वर्षांपासून त्यांनी ज्योतिष आणि धर्म यावर काम करत आहेत. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व याची त्या त्यांचा बातम्यांमधून समतोल राखतात. त्यांच्या मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, संगीताची आवड आहे. 

...Read More