लहान मुलाच्या तोंडी सर्वात आधी ''माँ'' शब्द का येतो? जाणून घ्या

खरे कारण जाणून घेण्यापूर्वी, आपण हे देखील जाणून घ्या की, बर्‍याच भाषांमध्ये मम्मी-पापासाठी वापरलेले शब्द जवळजवळ एकसारखेच असतात.

Updated: May 9, 2021, 05:56 PM IST
लहान मुलाच्या तोंडी सर्वात आधी ''माँ'' शब्द का येतो? जाणून घ्या title=

मुंबई : जेव्हा मुले मोठी होतात तेव्हा ते प्रथम त्यांच्या आईचेच नाव घेतात. त्यांच्या तोंडातून निघणारा पहिला शब्द म्हणजे 'मा' किंवा 'मामा' असाच असो परंतु असे का घडते असा प्रश्न तुम्हाला पडला असेल? यामागे काही कारण आहे का? आज, मातृदिनानिमित्त आम्ही आपल्याला याबद्दल माहिती देणार आहोत. कौटुंबिक आणि मानवी विकासाचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांनी संशोधन केले आहे, जे जाणून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल. त्यांच्या संशोधनात असेही आढळले की, ते मुलं आईचे नाव घेण्या व्यतिरिक्त ते पापा, मॅाम, डॅड असे देखील शब्द उच्चारतात.

खरे कारण जाणून घेण्यापूर्वी, आपण हे देखील जाणून घ्या की, बर्‍याच भाषांमध्ये मम्मी-पापासाठी वापरलेले शब्द जवळजवळ एकसारखेच असतात. जर आपण एखाद्या अज्ञात देशात जाऊन 'मॅाम' शब्द उच्चरलात तर तेथील लोकांना समजेल की, तुम्ही तुमच्या आईबद्दल बोलत आहात. त्याचप्रमाणे, जगभरात 'पापा'साठी जवळजवळ समान शब्द आहे. जसे- पापा, बाबा, डॅड, पपा इत्यादी.

पालकांशी संबंधित 1072 शब्द सापडले

जॉर्ज पीटर मर्डोक नावाच्या मानसशास्त्रज्ञ 1940 च्या दशकात जगभर फिरला. यावेळी, त्याला वेगवेगळ्या ठिकाणी पालकांशी संबंधित 1072 शब्द सापडले. त्याने या शब्दांना अशा लोकांकडे दिले ज्यांना भाषेबद्दल चांगले ज्ञान आहे.

कारण काय आहे?

त्या व्यक्तिला असे आढळले की, मुले प्रथम फक्त ओठातून उच्चारले जाणारे शब्दच बोलतात. म्हणूनच, ते एम, बी आणि पी या अक्षरापासून सुरू होणारे शब्द बोलतात. यानंतर, ते टी आणि डी अक्षरापासून सुरू होणारे शब्द बोलतात. हेच कारण आहे की, मुले सुरवातीला ममा, मॅाम, हे शब्द उच्चारतात.

मोठी झाल्यावर नावानं बोलवत नाहीत

मुलं मोठी झाली की, ते आई-वडीलांना नावाने का हाक मारत नाहीत? सामाजिक जीवनात आणि समाजात जगण्यासाठी माणसाचे स्वतःचे नियम आहेत. त्यानुसार आपण समाजात वावरतो. आई-वडीलांना नावाने बोलवायचे नाही असा कुठेही कायदा नाही.

परंतु आपण स्वत:हून ते करत नाही. कारण आपण आपले नियम संस्कृती, परंपरेला जोपासतो आणि आपल्या वडीलधाऱ्या माणसांना सम्मान देतो. त्यामुळे त्यांना नावाने बोलवले जात नाही.