MP Iqra Hasans Deepfake video: सोशल मीडियावर तंत्रज्ञानाचा धोकादायक वापर समोर आला आहे. समाजवादी पक्षाच्या खासदार इकरा हसन चौधरी यांचा एक डीप फेक व्हिडिओ सोमवारी रात्री उशिरा व्हायरल झाला. हा व्हिडिओ एआय तंत्रज्ञानाचा वापर करून बनवण्यात आला होता. जो दोन अल्पवयीन मुलांनी "इकरा हसन चौधरी एमपी" नावाच्या बनावट फेसबुक अकाउंटवर अपलोड केला होता. व्हिडिओ समोर येताच त्यांच्या समर्थकांमध्ये संताप पसरला.
यूपी डीजीपींच्या आदेशानुसार कारवाई
समाजवादी सांसद इकरा हसन की घटना ने
सभी को सोच में डाल दिया है।जब एक महिला सांसद AI Deapfake वीडियो के माध्यम से टारगेट की जा सकती हैं
तो सामान्य लड़कियों और महिलाओं का खुदा ही रहबर है।Iqra Hasan तो एक सासंद थी जो तुरंत कार्यवाही हो गई लेकिन रोज बहुत बड़ी संख्या में महिलाएं… pic.twitter.com/Cuu5njOrmj
— Uzma Parveen (@UzmaParveen94) July 2, 2025
आरोपींनी खासदारांचे समर्थक इमरान नदवी यांनी ट्विटरवरील व्हिडिओमधून एक फोटो काढला आणि उत्तर प्रदेश पोलिसांना टॅग करून तक्रार केली. यानंतर डीजीपींच्या आदेशानुसार शामली पोलिसांनी या प्रकरणाची जबाबदारी सायबर सेलकडे सोपवली आहे. आता व्हिडिओ आणि फेक अकाउंटची चौकशी सुरू करण्यात आली आहे. आरोपींची ओळख पटताच त्यांना अटक केली जाईल आणि कठोर कारवाई केली जाईल, असे एसपी शामली रामसेवक गौतम यांनी सांगितले होते.
AI ऐप से सांसद इकरा हसन की फर्जी वीडियो बनाकर वायरल की, पंचायत में युवकों ने मांगी माफी #AIhttps://t.co/IH0OqmTtqA
— Rupesh dubey (@rupeshdubey8885) July 1, 2025
नूह जिल्ह्यातील फिरोजपूर झिरका येथील आमका गावातील दोन तरुणांनी एआय अॅपच्या मदतीने व्हिडिओ बनवला होता. दरम्यान घटनेचे गांभीर्य पाहून मेवात परिसरातील एका सरपंच पुढे आले आहेत. तिने स्वतः मुलांकडून माफी मागून एक माफीनामा व्हिडिओ जारी केला आहे. ज्यामध्ये संपूर्ण मेवातच्या वतीने खेद व्यक्त करण्यात आला आहे. तसेच सोशल मीडियावर व्हायरल झालेले जुने व्हिडिओ काढून टाकण्यात आले आहेत.
एआयचा दुरुपयोग करण्याची ही काही एकमेव आणि पहिली घटना नाही. फेसबुक, इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर इकरा हसन चौधरीच्या नावाने शेकडो बनावट खाती सक्रिय आहेत. यामध्ये खासदाराच्या फोटो आणि व्हिडिओ डाऊनलोड करुन ते एडीट केले जातात. काही दिवसांपूर्वी खासदार इकरा यांनी पोलीस अधिकाऱ्यांना बनावट अकाऊंट्सची यादी सोपवली होती. पण अद्याप यावर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
"प्रवीण सुरेश दाभोळकर हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये चीफ सब एडीटर पदावर कार्यरत आहेत त्यांना मीडिया क्षेत्राचा 14 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल मीडियासह विविध माध्यमांमध्ये काम केले आहे. संशोधनात्मक अहवाल आणि फिचर रायटिंगकडे त्यांचा कल आहे. वाचकांना माहिती नसलेल्या कथा लोकांसमोर आणण्याची त्यांना आवड आहे. हे करीत असताना सविस्तर तपशील आणि अचूकतेकडे त्यांची कटाक्षाने नजर असते. फावल्या वेळात प्रविण आपल्या आनंदासाठी फिरणे, नवीन गोष्टी आत्मसात करणे आणि सामाजिक कार्यात गुंतलेले असतात. त्यांचे लेखन अनेकदा सामाजिक न्यायाच्या समस्यांबद्दलची त्यांची उत्कटता दर्शवते. तसेच आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात."
...Read More|
SRH
(20 ov) 219/6
|
VS |
PBKS
223/4(18.5 ov)
|
| Punjab Kings beat Sunrisers Hyderabad by 6 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
RCB
(20 ov) 201/8
|
VS |
RR
202/4(18 ov)
|
| Rajasthan Royals beat Royal Challengers Bengaluru by 6 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
OMA
(50 ov) 218/9
|
VS |
NAM
223/9(49.3 ov)
|
| Namibia beat Oman by 1 wicket | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.