Aurangzeb History GK : इतिहासात डोकावल्यानंतर काही संदर्भ, काही व्यक्तींचे उल्लेख अगदी हमखास होतात. त्यातलंच एक नाव म्हणजे सर्वात क्रूर मुघल शासक औरंगजेब. आपल्या सत्ताकाळात त्यानं लागू केलेले नियम असो किंवा शत्रूला दिलेली वागणूक असो. औरंगजेबाविषयीची माहिती जितक्यांचा समोर आली आहे तितक्यांदा ही क्रूरता नेमकी कुठवर जाऊ शकते याचीच प्रचिती येते. मुघल साम्राज्यातील सर्वोच्च पदावर विराजमान होण्यासाठी औरंगजेबानं सख्ख्या भावंडांचाही खात्मा केला, वडील शहाजहां यांना नदरकैदेत ठेवलं. इतकंच काय, तर स्वत:च्या मुलालाही संपवलं.
आपला मुलगाच आपल्या वाटेतील काटा आहे, याची कुणकुण लागताच या शासकानं त्यालाही संपवलं. हे सर्व त्यावेळी घडलं जेव्हा औरंगजेब दारा शिकोहला वाटेतून हटलत स्वत: तख्तावर बसू इच्छित होता. परदेशी इतिहासकार फ्रांस्वा बर्नियरयांनी यासंदर्भातील उल्लेख लिखित स्वरुपात संग्रहित ठेवल्याचं म्हटलं जातं. 1658 मध्ये बर्नियर भारतात आला आणि दारा शिकोहसोबत त्याची मैत्री झाली.
बर्नियर सांगतो, 1658 या वर्षी जेव्हा सामूगढच्या लढाईत औरंगजेबानं दाराचा पराभव केला आणि सत्तेचा कट रचत त्यानं मुराद बख्श याच्यासह आग्रा गाठलं. तिथं महालात पोहोचून त्यानं शहाजहांला संदेश पाठवला आणि आपण बादशहा शहाजहां यांचा हुकूम ऐकण्यासाठी इथं आल्याचं सांगितलं. इथंच वडील- मुलांमधील नात्याला तडा गेला. शहाजहांलाही आपल्या मुलाच्या बोलण्यावर विश्वास नव्हता. त्यामुळं त्यानं दाराचं वागणं योग्य नसल्यानं खोटं उत्तर शहाजहांनं पाठवलं. हा संदेश पाहून महालाज जाण्याचं धाडस औरंगजेबाला करता आलं नाही. किंबहुना हा संदेश बहीण जहांआरानच पाठवल्याचा संशय औरंगजेबाला आला. दारनं बाहशहा व्हावं अशीच तिची इच्छा होती. शहाजहांचा आपल्या लेकीवर फार विश्वास असल्यानं या कारणामुळं औरंगजेबाला कैक दिवस महालात जाण्याचं धाडस करता आलं नाही. याचदरम्यान औरंगजेबाचा मुलगा सुल्तान यानं या महालाला वेढा घातला.
महालाला वेढा घालण्याच्या काही दिवसांपूर्वीच सुल्तान आग्र्यात दाखल झाला आणि औरंगजेबाचा संदेश आपण आल्याचं त्यानं तिथं सांगितलं. पहारेकऱ्यांनी त्याला तताडीनं ताब्यात घेतलं. आपण शत्रूसाठी रचलेल्या या सापळ्यात आपलीच माणसं फसल्याचं पाहून शहाजहांलाही धक्का बसला. अखेर तुला बादशाही दिली तरी आमची साथ द्यावी लागेल अशी अट शहाजहांनं सुल्तानपुढं ठेवली.
बर्नियर यांच्या उल्लेखांनुसार जर सुल्ताननं बादशाहचं म्हणणं ऐकलं असतं, तर तोच बादशाह असता. इथं औरंगजेबाच्या आत्मविश्वासाला तडा गेला. पुढं नियतीच्या मनात मात्र काही वेगळंच होतं. सुल्ताननं शहाजहांचं म्हणणंही ऐकलं नाही आणि तो त्याच्या भेटीलाही गेला नाही. त्यानं महालाच्या सर्व प्रवेशद्वारांच्या किल्ल्या शहाजहांकडे मागत औरंगजेबाला महालात सुरक्षित नेता येईल याची तजवीज केली. पुढे औरंगजेब पूर्ण सुरक्षेत महालात आला पण, आग्रा आता कोणा दुसऱ्याच्याच ताब्यात जाईल अशी भीती त्याला सतावू लागली.
औरंगजेबाला आपल्याच माणसांपासून धोका असल्याची चाहूल लागली आणि यात पुढे होता त्याचा मोठा मुलगा सुल्तान मोहम्मद आणि मीर जुमला. मीर जुमला ही तिच व्यक्ती ज्यानं औरंगजेबला गोवळकोंड्यावर हल्ला करत खजिना लुटण्यास मदत केली होती. सुल्तानपासून त्याला या कारणास्तव भीती होती, की ज्या महालात खुद्द औरंगजेब पोहोचू शकला नव्हता तिथं काहीही कल्पना न देता सुल्ताननं ताबा मिळवला होता.
औरंगजेबनं सुल्तान आणि मीर जुमला या दोघांनाही आग्र्यापासून दूर पाठवण्याचा कट रचला. जेव्हापर्यंत शाह शुजाचा पराभव होत नाही तोपर्यंत तुम्ही इतिहास रचला असं म्हणता येणार नाही असा बनाव रचत त्यानं या दोघांनाही आग्र्यापासून दूर केलं. शाह शूजाला संपवण्यासाठी निघाललेल्या या दोघांमध्येही मतभेद झाले. सैन्याचं नेतृत्व मीर नव्हे तर आपल्याकडे असावी असंच सुल्तानला वाटत होतं. आपल्यामुळंच आग्रा औरंगजेबाला मिळालं असं सुल्तान सतत म्हणत राहायचा.
पुढे.... औरंगजेबापर्यंत ही गोष्ट पोहोचली. औरंगजेब आपल्याला कैद करु शकतो याची कुणकुण सुल्तानला लागली आणि तो शाह शूजाकडे पोहोचला. ही औरंगजेबाचीच चाल असल्याचं शाह शूजाला वाटलं आणि त्यानं सुल्तानची मदत केली नाही आणि इथं सुल्तान वाईटरित्या फसला. शेवट तोच... ज्याची अपेक्षा होती. औरंगजेबाच्या एका आदेशानंतर लगेचच सुल्तानला कैद करत ग्वाल्हेरच्या किल्ल्यात आणलं गेलं. काही काळानंतर त्याला दिल्लीच्या यमुनातटी असणाऱ्या सलीमगड किल्ल्य़ावर ठेवण्यात आलं. जवळपास वर्षभरानंतर 1676 मध्ये विष देऊन सुल्तानला संपवण्यात आलं आणि इतिहासानं आणखी एक क्रूर मृत्यू पाहिला...