मुंबई -अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम सुरू असताना मोठा अपघात; 25 एक्स्प्रेस रद्द, रूट आणि टाइम जाणून घ्या

Mumbai-Ahmedabad Bullet Train: मुंबई -अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सुरू असताना अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. याचा फटरा रेल्वेला बसला आहे.   

मानसी क्षीरसागर | Updated: Mar 24, 2025, 12:31 PM IST
मुंबई -अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम सुरू असताना मोठा अपघात; 25 एक्स्प्रेस रद्द, रूट आणि टाइम जाणून घ्या
Mumbai-Ahmedabad Bullet Train accident more than 25 train cancelled

Mumbai-Ahmedabad Bullet Train: अहमदाबाद-मुंबईदरम्यान निर्माणीधीन असणाऱ्या बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या घटनास्थळी मोठा अपघात झाला आहे. जेव्हा अहमदाबादच्या वटवाजवळ सेगमेंटल लाँचिग गर्डर कोसळला. रात्री जवळपास 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून या अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झाली नाहीये. मात्र या घटनेमुळं डझनभर ट्रेन रद्द कराव्या लागल्या आहेत. तर, काही ट्रेनचे मार्ग बदलण्यात आले आहेत. या अपघातामुळं जवळपास 25 ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. तर 5 रिशेड्युल करण्यात आले असून 6 ट्रेनचे मार्ग बदलण्यात आले आहेत. 

अहमदाबादच्या जवळ वटवाजवळ बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सुरू आहे. गर्डर लाँच करण्यात येत असताना तोल बिघडल्याने ही घटना घडली आणि गर्डर कोसळला. ज्यामुळं रेल्वे रूळांचे नुकसान झालं आहे. रेल्वे रूळांचे नुकसान झाल्यामुळं वटवा-अहमदाबाद डाउन-लाइनचे नुकसान झाले आहे. या अपघातामुळं अनेक ट्रेन रद्द झाल्या आहेत आणि अनेक ट्रेनचे मार्ग बदलण्यात आले आहेत. 

रेल्वे रूळांचे नुकसान झाल्यामुळं डझनभर ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. अनेक रेल्वेचे मार्ग बदलण्यात आले आहेत. मुंबई सेंट्रल ते गांधीनगर कॅपिटल वंदे भारत एक्स्प्रेस अंशता रद्द करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त ट्रेन संख्या 20936 इंदौर-गांधीधाम एक्स्प्रेसला नाडियाड-गांधीधाम दरम्यान अंशता रद्द करण्यात आले आहेत. ट्रेन संख्या 19310 इंदौर-अहमदाबाद शांती एक्सप्रेस रद्द करुन आनंद स्टेशनपर्यंतच चालवण्यात आली आहे. तर 09412 ग्वालियर-अहमदाबाद स्पेशल ट्रेन छायापुरी-अहमदाबाद दरम्यान अंशता रद्द करण्यात आले आहे. ट्रेन संख्या 19166 दरभंगा-अहमदाबाद साबरमती एक्सप्रेस 23 मार्च 2024 रोजी महमूदाबाद खेडा रोड स्थानकापर्यंतच धावणार आहे. 

अनेक रेल्वे रद्द

रेल्वेने वटवा-बोरिवली एक्सप्रेस, अहमदाबाद-मुंबई सेंट्रल एक्सप्रेस, वडोदरा-वटवा इंटरसिटी, अहमदाबाद-वलसाड गुजरात क्वीन, जामनगर-वडोदरा इंटरसिटी, वडनगर-वलसाड-वडनगर एक्सप्रेस, वटवा-आनंद एक्सप्रेससह सुमारे २५ गाड्या रद्द केल्या. प्रवाशांच्या मदतीसाठी रेल्वेने एक हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे.